Video : Miamiच्या रस्त्यावर भारतीय तरुणाच्या जबरदस्त Dance moves, परदेशी तरुणींनाही लावलं वेड

Dance Video : एका शीख (Sikh) मुलाचा डान्स (Dance) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने परदेशात रस्त्यावर आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह्सने सर्वांना वेड लावले आहे.

Video : Miamiच्या रस्त्यावर भारतीय तरुणाच्या जबरदस्त Dance moves, परदेशी तरुणींनाही लावलं वेड
शिख तरुणाचा मियामीच्या रस्त्यावर परदेशी तरुणाईसोबत डान्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 11:55 AM

Dance Video : भारतीय लोकांमध्ये टॅलेंट किती भरलेले आहे, हे एक भारतीय म्हणून तुम्हाला चांगले माहीत असेल. ही प्रतिभा कुठेतरी बाहेर पडत असते. परदेशातही भारतीय लोक आपली प्रतिभा सिद्ध करतात, हे तुम्ही पाहिले असेलच. ही प्रतिभा प्रत्येक क्षेत्रात असू शकते, मग ते गाणे असो, नृत्य असो किंवा काही स्टंटबाजी असो, लोक आपल्या प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित करतात. एका शीख (Sikh) मुलाचा डान्स (Dance) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने परदेशात रस्त्यावर आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह्सने सर्वांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर अनेकदा डान्सशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असले, तरी या व्हिडिओमध्ये भारतीय मुलाने केलेला डान्स पाहून परदेशीही आश्चर्यचकित झाले.

परदेशी मुलांनी केले स्वागत

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की काही परदेशी लोक रस्त्यावर नाचत आहेत आणि एक शीख मुलगा त्यांचा डान्स पाहत आहे. परदेशी लोकांचा डान्स पाहून तो त्यांना थांबवू शकत नाही आणि तो ‘डान्स फ्लोअर’कडे चालत जातो. तो स्विंग करत जातो, ते पाहून परदेशी मुलांना समजले, की त्याला नाचायचे आहे, म्हणून ते त्याला पुढे करतात. यानंतर समोर येणारा शीख मुलाचा डान्स थक्क करणारा आहे. त्याने अशा डान्स मूव्ह्स दाखवल्या, जे पाहून परदेशी मुलांनी उड्या मारल्या आणि आरडाओरडा सुरू केला. त्याचवेळी अनेक लोक उभे राहून त्याचा जबरदस्त डान्स पाहत होते आणि काही लोक व्हिडिओ बनवण्यातही मग्न होते.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ फ्लोरिडामधील मियामी शहरातील असल्याचे सांगितले जात आहे, जो turbanmagic नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या डान्स व्हिडिओला आतापर्यंत 6 लाख 13 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 67 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून त्या व्यक्तीच्या डान्सचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा :

Sindhudurg : गोमूचे खेळावरही पुष्पाचा Fever; हौशी कलाकार Srivalli गाण्यावर धरतायत ठेका!

विजेशिवाय चालते ‘ही’ Treadmill! आता घरीच व्यायाम करा आणि पैसेही वाचवा, Jugaad Video viral

नोकरीतून निवृत्ती घेऊन शेतात पहिल्यांदाच गेल्यावर असं काहीतरी होणारच! पाहा अतरंगी Viral video

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.