तरुण घरातील टॉयलेटमध्ये गेला आणि अचानक कमोडमधून डोकावू लागला नाग, पुढे जे काय घडलं त्याने….
शेतात पाणी साचल्यामुळे साप घरामध्ये शिरत आहेत. पीडित कुटुंबातील महेश नवाच्या व्यक्तीने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, त्यांच्या घरात एका पाठोपाठ दोन कोब्रा जातीचे साप आढळले आहेत. त्यानंतर आता त्यांच्या घरातील टॉयलेटमध्ये साप आढळला आहे.

नैसर्गिक विधीसाठी एखादी व्यक्ती टॉयलेटमध्ये जाते आणि अचानक टॉयलेटमध्येच किंग कोब्रा सारखा भयानक साप आढळला तर? किती भयानक प्रसंग आहे. अशा प्रसंगाचा आपण एखादवेळेला विचार करु शकतो, किंवा एखाद्या वाईट स्वप्नात असा प्रसंग आपण पाहू शकतो. पण इंदौरमध्ये असा प्रसंग वास्तव्यात देखील घडला आहे. एक व्यक्ती टॉयलेटला जाते. संबंधित व्यक्ती कमोडवर बसण्याच्या तयारीत असतानाच कमोडमधून साप डोकवताना दिसला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती व्यक्ती कशीतरी टॉयलेट बाहेर पडते आणि घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती देते.
मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली आहे. गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत अरिहंत कॉलनीमध्ये असणाऱ्या एका घरात हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या घरात याआधीदेखील दोन कोब्रा साप आढळले आहेत. यानंतर आता थेट टॉयलेटच्या कमोडमधून साप निघाल्याची घटना घडली आहे. या घरात वास्तव्यात असणाऱ्या कुटुंबातील एक व्यक्ती आज सकाळी टॉयलेटला गेली तेव्हा कमोडमधून साप असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. यानंतर संबंधित व्यक्ती घाबरुन धावतपळत आपल्या इतर कुटुंबियांकडे गेला. त्याने कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. यानंतर रेस्क्यू टीमला बोलावण्यात आलं. रेस्क्यू टीमने साप कमोडमधून बाहेर काढत त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं आहे. पण या घटनेमुळे संबंधित कुटुंब प्रचंड दहशतीत आहे.
एका पाठोपाठ दोन कोब्रा साप
संबंधित कुटुंबाचं घर हे शेतात असल्याची माहिती मिळत आहे. शेतात पाणी साचल्यामुळे साप घरामध्ये शिरत आहेत. पीडित कुटुंबातील महेश नवाच्या व्यक्तीने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, त्यांच्या घरात एका पाठोपाठ दोन कोब्रा जातीचे साप आढळले आहेत. त्यानंतर आता त्यांच्या घरातील टॉयलेटमध्ये साप आढळला आहे. आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आज सकाळीसाठी टॉयलेटसाठी गेली. ती व्यक्ती टॉयलेट सीटवर बसणारच होते तेवढ्यात त्यांची नजर कमोडमध्ये असणाऱ्या सापावर पडली. कमोडमध्ये कोब्रा साप बाहेरच्या दिशेला डोकावताना दिसत होता. यामुळे संबंधित व्यक्ती प्रचंड घाबरली. ती व्यक्ती तशीच टॉयलेटच्या बाहेर आली आणि आरडाओरड करु लागली. त्यानंतर आपण तिथे गेल्यावर सर्व प्रकार लक्षात आल्याचं महेश यांनी सांगितलं. यानंतर संबंधित कुटुंबाने आजूबाजूच्या नागरिकांना सूचना दिली.
वन अधिकारी काय म्हणाले?
कमोडमध्ये साप आढळल्यानंतर रेस्क्यू टीमला याबाबत माहिती देण्यात आली. या रेस्क्यू टीमला साप ताब्यात घेण्यात यश आलं. पण साप घेऊन गेल्यानंतरही पीडित कुटुंबियांमध्ये दहशत बघायला मिळत आहे. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पीडित कुटुंबाचं घर शेतात आहे. पावसाळ्यात शेतात पाणी साचतं. त्यामुळे साप पाण्यापासून वाचण्यासाठी घरात घुसायला लागतात. आजूबाजूच्या इतर घरांमध्येही साप निघाल्याची माहिती समोर आली आहे, अशी प्रतिक्रिया वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वन अधिकाऱ्यांच्या मते, पावसाळ्यात साप आणि इतक किटक बाहेर पडतात. पावसाळ्याचं पाणी जेव्हा जमिनीच्या आत शिरतं तेव्हा सापांच्या बिळात पाणी शिरतं. त्यामुळे साप आणि इतर किटक सुरक्षेच्या कारणास्तव उंच ठिकाणाकडे जातात. अशा परिस्थितीत त्यांना शेतात असलेली घरं सुरक्षित वाटतात. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने नागरिकांना सावधान राहण्याचं आवाहन केलं आहे.
