साप चप्पल घेऊन पळाला! होय चक्क साप चप्पल उचलून पळालाय…बघा
ती चप्पल सापाने तोंडात धरली. हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे. धक्का सुद्धा बसतो कारण यापूर्वी आपण असं काही पाहिलेलंच नाही.

सापाला पाहून लोकांची सिट्टी-पिट्टी गुल होते. सोशल मीडियावर सापाचा एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामुळे तुम्ही हसून हसून वेडे व्हाल. एक साप एका महिलेच्या दिशेने जात असतो. ते पाहून ती महिला प्रचंड घाबरते आणि ती त्या सापाला चप्पल फेकून मारते. आता माणूस घाबरून जे हाताला येईल ते फेकून मारणारच. ही महिला चप्पल फेकते. जशी महिलेने ही चप्पल फेकली, तशी ती चप्पल सापाने तोंडात धरली. हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे. धक्का सुद्धा बसतो कारण यापूर्वी आपण असं काही पाहिलेलंच नाही.
हे दृश्य पाहून सर्वच युझर्स हैराण झाले. तसे तर आईच्या चपला चांगल्याच दुरुस्त करतात. हा व्हिडिओ एका आयएफएस अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला होता, त्यानंतर ही क्लिप व्हायरल झाली. सध्या तरी हा व्हिडिओ कधी आणि कुठचा आहे, याची माहिती मिळालेली नाही.
हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – मला आश्चर्य वाटते की हा साप त्या चप्पलचे काय करणार? त्याला पायही नाहीत.
I wonder what this snake will do with that chappal. He got no legs. Unknown location. pic.twitter.com/9oMzgzvUZd
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 24, 2022
आतापर्यंत या क्लिपला 34,000 हून अधिक व्ह्यूज आणि 1700 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोकही या व्हिडिओला चांगली प्रतिक्रिया देत आहेत.
एका व्यक्तीने लिहिले की, हा बिहारचा साप आहे! इथले नेते आणि साप आल्यानंतर रिकाम्या हाती जात नाहीत. ही क्लिप फक्त ३० सेकंदांची आहे.
यामध्ये एक स्त्री साप बघून मोठ मोठ्याने ओरडत आहे. त्यानंतर साप जसा जवळ येऊ लागतो ती महिला त्याला चप्पल फेकून मारते. यानंतर साप आपली कलाकारी दाखवतो, तो ती चप्पल तोंडात धरतो आणि तिथून वेगाने धावतो. हे पाहून बायका हसू लागतात आणि चप्पल कुठे नेली जातेय, असं म्हणतात.
