Video : रेल्वे रुळांवर बाईक स्टंट, अचानक आली ट्रेन, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद

सध्या लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही वेड्यावाकड्या गोष्टी करतात. कधी कधी जीवाची परवा न करता प्रसिद्धीसाठी व्हिडीओ बनवताना केलेला वेडेपणा अंगाशी येऊ शकतो.

Video : रेल्वे रुळांवर बाईक स्टंट, अचानक आली ट्रेन, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद
ट्रेनखाली आलेली स्कुटी

जामनगर : सध्या ऑनलाईन व्हिडीओतून प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक विचित्र प्रकारचे व्हिडीओ बनवत असतात. अनेकदा जीवघेणे स्टंटही करत असतात. अशीच एक घटना गुजरातच्या जामनगर येथे घडली. त्याठिकाणी एक व्यक्ती रेल्वे रुळांवर बाइक स्टंट करत होता. पण अचानक ट्रेन आली आणि भांबावलेल्या युवकाने स्कुटी रुळावरच टाकून बाजूला झाला. ज्यामुळे स्कुटीचा पार चकनाचूर झाला. (Stunt with Bike on Railway Track in Gujarat Jamnagar Dangerous Video goes Viral)

या व्हिडीओमध्ये गुजरातचा एक तरुण प्रसिद्धीसाठी जीवघेणा स्टंट करत आहे. जामनगरच्या सांढिया पुल येथील ही घटना आहे. ज्यात एक तरुण फोटो काढण्यासाठी थेट रेल्वे रुळांवर पोहोचलाय. सोबत आपली स्कुटीही घेऊन गेलाय आणि स्कुटीसोबत फोटो काढताना अचानक ट्रेन आल्याने तरुण घाबरला आणि बाजूला झाला. तो स्कुटी मात्र हटवू शकला नाही आणि त्यामुळे स्कुटी थेट ट्रेन खाली आली
ट्रेनने स्कुटीला फरफटत घेऊन जातानाचा व्हिडीओच व्हायरल होत आहे.

हाच तो व्हिडीओ – 

सर्वत्र व्हायरल होत आहे व्हिडीओ

या व्हिडीओला पाहून लोक हैरान झाले आहेत. व्हिडीओ पाहून तरुणालाही लोक खूप काही बोलत आहेत. देशभरात हा व्हिडीओ व्हायरल होत असून वेगवेगळ्या ठिकाणी हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.

तर बातम्या :

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | 28 बायका, 135 मुलं-मुली, तरीही लग्नाची हौस फिटेना, आता करतोय 37 वे लग्न, पाहा मजेदार व्हिडीओ

(Stunt with Bike on Railway Track in Gujarat Jamnagar Dangerous Video goes Viral)