Video: सासूने बांगड्यांचं विचारलं, तिने मोबाईलचं सांगितलं, सासू-सूनेचं कॉमेडी भांडण व्हायरल

सासू तिच्या चहाची वाट पाहत असल्याचे दिसतं तर तेवढ्यात सून चहा घेऊन येते. सासूची नजर इतकी तीक्ष्ण असते की, सून काय घालतेय की नाही हे ती लगेच पकडते. सुनेने हातात बांगड्या घातलेल्या नसतात

Video: सासूने बांगड्यांचं विचारलं, तिने मोबाईलचं सांगितलं, सासू-सूनेचं कॉमेडी भांडण व्हायरल
सासू सुनेचा व्हायरल व्हिडीओ

घरातल्या सासू सुनेच्या नात्याबद्दल काही न सांगितलेलंच बरं. आपल्याकडे ही घर घर की कहाणी आहे. सासू सुनेतले वाद कुणाला नवे नाही. सुनेला नेहमी तिच बरोबर वाटते, तर सासूला ती. मुलाच्या लग्नाआधी घरात अधिकार गाजवणाऱ्या सासूला वाटतं, सगळं तिच्या मनाप्रमाणेच व्हावं. त्यामुळेच दोघींचेही ट्रॅक कधी एकमेकींशी जुळत नाही. छोट छोट्या गोष्टींवरुन त्यांच्यात नेहमी वाद होतच राहतात. सासू सुना अशा भांडतात की, जसे की लहान मुलांमधली भांडणं. (The mother-in-law shouted at the daughter-in-law as she did not have bangles on her hands. Funny video viral)

सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्येही असंच काहीसं दिसतं. ज्यामध्ये सासू तिच्या चहाची वाट पाहत असल्याचे दिसतं तर तेवढ्यात सून चहा घेऊन येते. सासूची नजर इतकी तीक्ष्ण असते की, सून काय घालतेय की नाही हे ती लगेच पकडते. सुनेने हातात बांगड्या घातलेल्या नसतात, आणि अशाच मोकळ्या हाताने ती सासूला चहा देते. सासूला तर लगेच कारण भेटतं बोलायला. सासू वेळ न दवडता तिला अडवते. आणि विचारते की, अरे बेटा तुझे हात इतके रिकामे का आहेत?

सुनेला सासूचा मुद्दा समजत नाही आणि लगेच उत्तरात ती म्हणते की, अरे बाबा, मी माझा मोबाईल चार्जिंगला ठेवला आहे. यावर सासू लगेच चिडते आणि म्हणते की, तू काय डोक्यावर पडली आहे का? मी मोबाईलबद्दल नाही तर बांगड्यांबद्दल बोलत आहे. यावर सून सॉरी बोलते, पण सासू पुन्हा उग्रपणे बोलू लागते. सासू म्हणते तुझ्या त्या मोबाईलचा जाळ होवो. सासू-सुनेचे हे बोलणे ऐकून कुणालाही हसू आवरणार नाही.

पाहा व्हिडीओ:

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. rashikapunjabi नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आई, बांगड्यांबद्दल इतके सांगायची काय गरज होती. मोबाईल हा माझा खरा दागिना आहे. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडिओवर (Instagram Reels Video) त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.

हेही पाहा:

Video: परदेशातील हॅलोविनचा देसी अंदाज, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, आपली भूतं भंगडा करण्यात एक्सपर्ट आहेत!

Video: शूज चोरण्याच्या प्रयत्नात वऱ्हाडी भिडले, मांडवात तांडव, पाहा लग्नातील भन्नाट प्रसंग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI