AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचंही ऑफिसमध्ये झेंगाट नाही ना? ऑफिसच्या लफड्यांचा सर्व्हे पहिल्यांदाच समोर, तथ्य जाणून चक्रवाल

कामाच्या ठिकाणी होणारे प्रेमसंबंध आता सामान्य झाले आहेत. नुकत्याच फोर्ब्सने केलेल्या एका सर्व्हेनुसार, 60 टक्क्यांहून अधिक लोक ऑफिसमध्ये कोणत्या ना कोणत्या रोमान्समध्ये गुंतलेले असतात. यात ब्रेकअपची भीती, कामावर होणारा परिणाम आणि गॉसिप यांसारख्या समस्या असल्या तरी, अनेक जण विवाहबंधनातही अडकतात. कंपन्याही याकडे आता सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत.

तुमचंही ऑफिसमध्ये झेंगाट नाही ना? ऑफिसच्या लफड्यांचा सर्व्हे पहिल्यांदाच समोर, तथ्य जाणून चक्रवाल
ऑफिसमध्ये झेंगाट नाही ना ?Image Credit source: Getty Images
| Updated on: May 09, 2026 | 12:22 PM
Share

ऑफिसमध्ये होणारी लफडी म्हणजे रोमान्स हा विषय आता फक्त सिनेमा पुरता मर्यादित राहिलेला नाही. हल्ली प्रत्येक ऑफिसात कुणाचं तरी कुणाशी झेंगाट जुळलेलं दिसतं. ऑफिस ही अशी एकमेव जागा आहे, जिथे प्रत्येक व्यक्ती रोज दिवसाचे 9 तास घालवतो. म्हणजेच घरापेक्षा ऑफिसमध्ये लोकांचा अधिक काळ जातो. त्यामुळे ऑफिसमध्ये वावरताना एखाद्या व्यक्तीसोबतचं प्रेम जुळणं हे स्वाभाविक आहे. ऑफिसमधील याच रोमान्सवर एक सर्व्हे आला आहे. त्याची आकडेवारी आश्चर्यकारक तितकीच धक्कादायक आहे.

फोर्ब्सने एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यात ही आकडेवारी समोर आली आहे. 60 टक्क्याहून अधिक लोक कामाच्या ठिकाणी कोणत्या कोणत्या रोमांटिक नात्यात राहिलेले आहेत. 9 तास ऑफिसमध्ये थांबणं, रोज सोबत काम करणं आणि व्यावसायिक ताण समजून घेणारा सहकारी हवा असल्याने अनेक जण ऑफिसमध्ये पार्टनर शोधतात, असं फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. फोर्ब्सचा सर्व्हे व्हायरल झाला आहे. लोक त्यावर आपले अनुभव व्यक्त करत आहेत.

सर्व्हेनुसार 65 टक्के लोकांनी कन्फर्टेबल फिल होण्यासाठी ऑफिसमध्ये रिलेशनशीप होत असल्याचं म्हटलं आहे. तर 61 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार ऑफिसच्या बाहेर नव्या लोकांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र, 38 टक्के लोकांनी ऑफिसमध्ये रोमान्स असेल तर काम अत्यंत हसतखेळत होत असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी भावनात्मक समजूतदारपणावर भर दिला आहे.

सर्वाधिक भीती ब्रेकअपची

तथापि, या नात्याचा संबंध केवळ पर्सनल लाइफपर्यंत राहत नाही. तर ऑफिस रिलेशनशीपमध्ये ब्रेकअपची भीती सर्वाधिक असते. कारण रोज त्याच व्यक्तीची भेट होत असते. त्याच्याशीच ऑफिसच्या कामानिमित्त बोलणं होतं. 54 टक्के लोकांच्या मते ऑफिसमधील डेटिंगमुळे त्यांच्या वर्क लाइफ बॅलन्सवर परिणाम होत असतो.

उघड होतंच

सर्व्हेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ऑफिसमधील तुमचा रोमान्स कधीच लपत नाही. रिलेशनशीपचा भांडाफोड झाल्यावर अर्ध्याहून अधिक सहकाऱ्यांचं वागणं बदलतं. 60 टक्के लोकांच्या मते तर ऑफिसमधील अफयेर नेहमीच गॉसिपचा विषय बनत असते.

40 टक्के पार्टनरने धोका दिला

रिपोर्टमध्ये एक गोष्ट सर्वात धक्कादायक होती. ती म्हणजे ऑफिसमध्ये रिलेशनशीप ठेवणाऱ्या लोकांना त्यांच्या पार्टनरने धोका दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पार्टनरने साथ सोडली किंवा चिटींग तरी केली, असं या लोकांनी सांगितलं. तर, 43 टक्के लोक असेही होते की त्यांनी ऑफिसमधील पार्टनरसोबतच लग्न गेलं. सर्व्हेच्या रिपोर्टनुसार, आता कंपन्यांचीही मानसिकता बदलली आहे. ऑफिस रोमान्स चुकीचा समजण्याऐवजी त्याच्याशी जुळवून घेण्यावर कंपन्यांनी भर दिला आहे. 62 टक्के लोकांनी तर त्यांच्या अफेयरची माहिती एचआरला दिल्याचंही सांगितलंय.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...