AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत… पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, वीज पडून महिलेसह 22 शेळ्यांचा मृत्यू

Maharashtra Monsoon Rain : गेल्या काही काळापासून ओढ दिलेल्या पावसाने आज राज्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच वीज कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे.

Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत... पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, वीज पडून महिलेसह 22 शेळ्यांचा मृत्यू
Maharashtra Rain UpdateImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 22, 2026 | 7:33 PM
Share

राज्याच्या विविध भागात आज पावसाचे हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह आसपासच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मागच्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलय.

जालना शहरात दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अचानक वादळी वारे सुरू झाले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने नागरिकांसह शेतकरीही चिंतेत होते. मात्र या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनीही या पावसाचे स्वागत केले असून आगामी काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

भंडाऱ्यात महिला पशुपालकासह 22 शेळ्या आणि एका म्हशीचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात आज मान्सून दाखल झाला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात विजांच्या कडकडाटसह आलेल्या या पावसात एका महिला पशुपालकासह 22 शेळ्या आणि एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिन्ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात घडल्या. तुमसरच्या लोहारा येथील घटनेत शेतात पाळीव जनावरे चारत असताना 50 वर्षीय भीमलता उचीबगले यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. तर अन्य घटनेत तुमसर तालुक्यातीलच देवनारा इथं वीज कोसळल्याने 22 शेळ्यांचा मृत्यू झाला. सुकडी देव्हाडा इथं वीज कोसळल्याने एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली.

डोंबिवलीत वरूण राजाची हजेरी

सायंकाळच्या सुमारास डोंबिवली फडके रोड आणि गणपती मंदिर परिसरातील कोसळल्या पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा का होईना पण दिलासा मिळाला आला.

नागपूरच्या काही भागात पावसाची हजेरी

नागपूरच्या काही भागात रिमझिम मॅान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारपासून नागपुरात ढगाळ हवामान होतं, आता रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. रिमझिम पावसामुळे तापमानात घट होऊन नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे, पण अद्याप मान्सूनचा पाऊस सुरु झालेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात मान्सूनच्या पावसाला आणखी चार दिवस लागणार आहेत.

गोंदिया जिल्ह्यात पावसाची हजेरी

गोंदिया जिल्ह्याचे तापमान 41 अंशावर पोहोचले होते, नागरिक उन्हापासून त्रासून गेले होते. अनेक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती आणि आज अचानक दुपारी जिल्ह्यामध्ये पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या आज पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या धान पिकाच्या पेरणीला वेग येणार असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. या पावसामुळे नागरिकांना उकाळ्यापासून दिलासा मिळणार आहे, मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही जिल्ह्याला कायम आहे.

पालघरमध्ये मान्सूनचे जोरदार आगमन

पालघर जिल्ह्यात अखेर मान्सूनचे आगमन झाले असून, पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग बरसलेल्या सरींमुळे वातावरणात मोठा बदल जाणवू लागला असून उकाड्यातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे गारवा अनुभवायला मिळत आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने दुचाकीस्वार आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरीप हंगामाच्या तयारीसाठी प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाने मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणीच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागात पावसाच्या सरींनी वातावरण आल्हाददायक झाले आहे.

इगतपुरी पावसाची हजेरी

नाशिकमधील इगतपुरी शहर व परिसरात पावसाची हजेरी पहायला मिळाली. जून महिना कोरडा जाणार असे वाटत असताना आज पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. अर्ध्या तासाच्या सततधारे नंतर पावसाने विश्रांती घेतली. अर्धा तास पडलेल्या पावसाने उकडा वाढला आहे. अजूनही शेतकऱ्यांना मुबलक पावसाची प्रतीक्षा आहे.

रत्नागिरीत दरड कोसळली

मुंबई – गोवा महामार्गावरील कोंडामाळा येथे महामार्गांवर पहिल्याच पावसात रुंदीकरणात कटाई करण्यात आलेल्या महामार्गालगत असलेल्या डोंगरावरून खाली महामार्गांवर मोठा दगड खाली आला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

रायगड जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री

रायगड जिल्ह्यात अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली असून खालापूर, कर्जत, पेन, सुधागड, माथेरान, खोपोली आणि पनवेल परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून येत असून खरीप हंगामातील शेती कामांना आता वेग येणार आहे.

अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री

अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री झाली. पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आलेगावातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

अहिल्यानगर : राहाता-शिर्डीत हलक्या सरी

अहिल्यानगरमधील राहाता-शिर्डीत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर कोपरगाव शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्ते जलमय त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची एंन्टी झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे,

बुलढाण्यात पावसाची दमदार हजेरी

बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून आनंदाचे वातावरण पसरले आहे . या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे . गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती , त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या सुद्धा रखडल्या होत्या. आज जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. माणगाव परिसरात पडलेल्या हलक्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तर कुडाळ तालुक्यातील काही भागांतही रात्री तुरळक पावसाने हजेरी लावत पावसाळ्याची चाहूल दिली. आंबा आणि काजू हंगामानंतर आता खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या आशा या पावसामुळे पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. ल्या आहेत.

रत्नागिरीतील लांजा परिसरात पावसाची जोरदार एंट्री

रत्नागिरीतील लांजा पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळाली. रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध भागात पावसाची रिमझिम सुरू होती. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची या पावसामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसामुळे लांजामध्ये वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!