Tina Dabi : टीना डाबीचा पहिला नवरा आता काय करतोय? यूजर्स म्हणतात, एकदम हँडसम IAS !

IAS टीना डाबीचा पहिला पती अतहरचे अनेक फोटो सध्या व्हायरल होतायेत. नुकतच टीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. त्यावरुन ती महाराष्ट्राची सुन होत असल्याचं दिसून आलं. याची जोरदार चर्चाही झाली होती. मात्र, आता टीनाच्या पहिल्या पतीचे फोटो व्हायरल होतायेत.

Tina Dabi : टीना डाबीचा पहिला नवरा आता काय करतोय? यूजर्स म्हणतात, एकदम हँडसम IAS !
टीना डाबीचा पहिला पती
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

| Edited By: भीमराव गवळी

Apr 01, 2022 | 2:28 PM

मुंबई : IAS टीना डाबीसंदरर्भात (IAS Tina Dabi) नुकतीच एक मोठी बातमी आली होती. टीना दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी होती. विशेष म्हणजे टीना डाबी दुसऱ्यांदा विवाह करणार असून ती महाराष्ट्राची सुनबाई होणार आहे. यूपीएससी (UPSC Topper) टॉपर आयएएस (IAS) टीना डाबी दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार असल्याचं तिनं सांगतिलयं. खुद्द टीना डाबीनं याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली होती. आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी टीना डाबी लग्न करणार आहे. विशेष म्हणजे टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. ‘तू दिलेलं हास्य परिधान करतेय’, अशा कॅप्शनसह टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. आता टीनाच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू असतानाच तिच्या पहिल्या पतीचे फोटो व्हायरल होतायेतय. टीना राजस्थान कॅडरच्या 2016च्या बॅचची यूपीएससी टॉपर टीना डाबीनं 2018 मध्ये अतहर आमीरसोबत निकाह केला होता. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर टीना आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर जरा वेगळीच चर्चा आहे.

अतहरची ही पोस्ट चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Athar Aamir Khan (@atharaamirkhan)

अतहरच्या पोस्ट चर्चेत

टीना डाबी इन्स्टाग्रामवर फेमस असली तरी तिचा पहिला पती देखील इन्स्टारग्रामवर फेमस आहे. आयएएस अतहर आमिर खान यालाही आपले फोटो शेअर करण्याची सवय आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरी आयएएस अतहर आमिर खान याने आपले काही खास फोटो काढले होते. हे त्याने शेअर केले होते. यानंतर त्यावर नेटिझन्सकडून चांगलीच पसंती मिळाली. अतहर श्रीनगरमध्ये सध्या कर्तव्यावर आहे. तो नेहमी त्याच्या वेगवेगळ्या लूकवरुन चर्चेत असतो. अतहरला इन्स्टाग्रामवर जवळपास पाच लाख पंन्नास हजार लोक फॉलो करतात. त्यामुळे अतहरची लोकप्रियाता तुमच्या लक्षात येईल.

अतहरच्या पोस्टला पसंती

 

View this post on Instagram

 

A post shared by Athar Aamir Khan (@atharaamirkhan)

नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

अतरहरच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याने काळा टी शर्ट आणि जिन्स घातली आहे. फोटोचा बॅग्राऊंड देखील सुंदर आहे.डोगरांच्या मधोमध सूर्य मावळतानाचा हा फोटो आहे. या पोस्टला एक लाखापेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नटिझन्सकडून आल्या आहेत.

टीनाची पोस्ट चर्चेत

‘तू दिलेलं हास्य परिधान करतेय’, अशा कॅप्शनसह टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. आता टीनाच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झालीय. टीना राजस्थान कॅडरच्या 2016 च्या बॅचची यूपीएससी टॉपर टीना डाबीनं 2018 मध्ये अतहर आमीरसोबत निकाह केला. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.

टीनाला अनफॉलो केलं

आमीरसोबत निकाह केल्यानंतर टीनानं तिच्या नावापुढे खान आडनाव लावलं होतं. तलाकसाठी अर्ज करण्यापूर्वी तिनं सोशल मीडिया अकाऊंटवरून खान आडनाव काढलं होतं. त्यानंतर अतहरनं टीनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. टीनाचे वडील जसवंत डाबी आणि आई हिमानी इंजिनीयर आहेत. टीनाचं कुटुंब जयपूरचं आहे. मात्र तिचा जन्म भोपाळमध्ये झाला आहे. टीना सातवीत असताना तिचं संपूर्ण कुटुंब दिल्लीला शिफ्ट झालं.

इतर बातम्या

तुमच्या मनात असतं एक आणि बोलता भलतंच? सावधान! तुम्हाला असू शकतो ‘हा’ गंभीर आाजार

महागाईविरोधात सोलापूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

Vicky Katrina Holiday: ‘WiFi नसतानाही कनेक्शन चांगलंय’ म्हणणाऱ्या विकीला नेटकऱ्यांचा अजब सवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें