AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikah halala : नवऱ्यानं सोडलं, सासऱ्यासोबतच हलाला, नंतर तर रांगच लागली; पीडित महिलेचा व्हिडिओ देशभर चर्चेत

Tragic story behind her burqa : देशभरात सध्या हिजाबवरून (Hijab) वाद सुरू आहे. महिलांची यात कुचंबणा होत आहे. तर समाजातही धर्माधर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यातच तलाकचं (Talaq) एक वेगळंच प्रकरण समोर आलंय. महिलेचा व्हिडिओ (Video) व्हायरल झालाय.

Nikah halala : नवऱ्यानं सोडलं, सासऱ्यासोबतच हलाला, नंतर तर रांगच लागली; पीडित महिलेचा व्हिडिओ देशभर चर्चेत
बुरखा/प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 19, 2022 | 11:12 AM
Share

Tragic story behind her burqa : देशभरात सध्या हिजाबवरून (Hijab) वाद सुरू आहे. महिलांची यात कुचंबणा होत आहे. तर समाजातही धर्माधर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यातच तलाकचं (Talaq) एक वेगळंच प्रकरण समोर आलंय. मध्यंतरी केंद्र सरकारनं ट्रिपल तलाकवर कायदा केला. त्याला काहींनी विरोध केला, मात्र तो कायदा आता अस्तित्वात आहे. हे सगळं असूनही महिलांची अवहेलना कमी होत नाही, हे विविध प्रकरणांवरून दिसून येतंय. एका महिलेचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. यात महिलेला तलाक देऊनच सासरची मंडळी थांबली नाहीत, तर एखाद्या खेळण्याप्रमाणं वागणूक या महिलेला मिळत आहे. न्यूज चॅनेल्सना प्रतिक्रिया देताना तिनं आपली कहाणी सांगितली आहे. विशेष म्हणजे पतीसह, सासरा आणि दीर यांच्याशीही लग्न करण्यास भाग पाडण्यात आलंय. आपली ही करूण कहाणी तिनं सर्वांसमोर मांडलीय.

हलाला करून छळ

संबंधित महिला कुठली आहे, हे समजू शकलं नाही. मात्र तिनं न्यूज चॅनेल्सना दिलेल्या बाइटमध्ये म्हटलंय, की तिचा विवाह 2009 साली झाला. दोन वर्ष या महिलेला अपत्य नाही, असा बहाणा करून पतीनं तलाक दिला. त्यानंतर हलाला (तलाक झालेल्या पत्नीशी पुन्हा विवाह) करून परत सासऱ्याशी विवाह करण्यास भाग पाडलं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर 2017 साली पुन्हा पतीनं तलाक दिला.

महिलेचा अतोनात छळ

या अशा वागणुकीनं ही महिला पुरती हैराण झाली. 2017 नंतर महिलेच्या घरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींची चर्चा केली. तर त्यांनी यावर अजबच उपाय काढला. त्यांनी दिराशी लग्न करण्याची अट घातली. महिलेचा हा अतोनात छळ हा सहन करण्याच्या पलिकडे होता. मी केवळ माझ्या पतीसाठी आहे, असं तिचं म्हणणं होतं. मात्र सासरच्या मंडळींनी अजब अट घालून तिला घरी घेण्यास नकार दिलाय.

तलाक पद्धतीला विरोध

या महिलेनं आता आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडत हलाला आणि तलाकच्या मुद्द्यावर आक्रमक मत मांडलंय. हलाला पद्धतीला विरोध तर केलाच. पण महिलेच्या इच्छेविरूद्ध तलाक होता कामा नये, असंही तिनं म्हटलंय. Vandana T.SH यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ ट्विट केलाय.

आणखी वाचा :

बाबा Busy आहेत, जा खेळायला; असं म्हणणाऱ्या वडिलांना काय उत्तर देतो ‘हा’ चिमुरडा? Emotional video viral

रब ने बना दी जोडी ! ब्रिटीश अधिकारी कामानिमित्त भारतात आली अन् सूनच झाली , ‘Incredible India’

Video : ‘पोरीच्या बापानं मागं लागलं पाहिजे, पोरगी कर म्हणून..’ Viral होतंय Shivlila Patil यांचं तुफान विनोदी कीर्तन

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.