AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसा कपड्यांचा रंग, तसाच त्याच्या डोळ्याचा रंग होतो… भारतातील हा चिमुकला एका रात्रीत बनला सोशल मीडिया स्टार; असं काय घडतं?

या मुलाच्या डोळ्याचा रंग त्याने परिधान केलेल्या कपड्यांप्रमाणे बदलतो....तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. सध्या या मुलाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जसा कपड्यांचा रंग, तसाच त्याच्या डोळ्याचा रंग होतो... भारतातील हा चिमुकला एका रात्रीत बनला सोशल मीडिया स्टार; असं काय घडतं?
ansh eye color change
| Updated on: Mar 04, 2025 | 6:03 PM
Share

हल्ली सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काहीही सांगता येत नाही. कधी नाचणारी मुलगी, तर कधी खळखळून हसणारा व्यक्ती, कधी एखादे गाणे, तर कधी एखादा पदार्थ… बदलत्या ट्रेंडनुसार सोशल मीडियावर अनेक गोष्टी या व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा लहान मुलगा त्याच्या गोंडस कृतीमुळे नाही तर त्याच्या डोळ्यांमुळे व्हायरल होत आहे. या मुलाच्या डोळ्याचा रंग त्याने परिधान केलेल्या कपड्यांप्रमाणे बदलतो….तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. सध्या या मुलाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील बीसा कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्श असे या मुलाचे नाव आहे. तो दीड वर्षाचा असून सध्या तो सोशल मिडिया स्टार बनला आहे. अर्शच्या डोळ्याचा रंग बदलताना पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. अर्शच्या डोळ्याचा रंग तो परिधान केलेल्या कपड्याप्रमाणे बदलतो, असा दावा त्याचे कुटुंब करत आहे. अर्शच्या डोळ्याच्या रंगामुळेच तो स्टार बनला आहे. त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या अर्शचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अर्श हा करड्या रंगाचे कपडे घालून दिसत आहे. त्यावेळी त्याचे डोळे करड्या रंगाचे आहे. त्यानंतर त्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करताच अचानक त्याच्या डोळ्याचा रंग काळा झाला. यानंतर त्याने हिरवे कपडे घातले तर त्याच्या डोळ्यांचा रंगही हिरवा होताना दिसत आहे. त्याचा डोळ्याचा सतत बदलणार रंग पाहून अनेक लोक याला दैवी चमत्कार असल्याचे समजू लागले आहेत.

अर्शच्या डोळ्याच्या रंगाबद्दल सतत चर्चा केली जात आहे. त्याला सतत कुणी खेळणी, कुणी मिठाई आणि चॉकलेट्स घेऊन देत आहेत. त्याच्या डोळ्यांचा रंग बदलताना व्हिडीओही काढत आहेत. तर काहीजण त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत. अर्शला ही देवाची देणगी मिळाली आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. याबद्दल डोळ्यांचे तज्ज्ञ डॉक्टर अखिलेश अग्रवाल यांनी हा निव्वळ भ्रम आहे. पण अर्शचे कुटुंबीय याला निसर्गाचा चमत्कार मानतात, असे म्हटले आहे.

लोकांच्या मनात कुतूहल निर्माण

अर्शच्या डोळ्याचा रंग अचानक कसा बदलतो हे आता एक गूढ बनले आहे. या घटनेने लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. पण त्यासोबतच पण विज्ञान आणि निसर्ग यांच्यात किती आश्चर्यकारक घटना घडू शकतात, याचा विचार करायला लावत आहेत

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.