AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जेव्हा हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानावर अचानक कोसळली वीज, निसर्गाचे भयंकर रुप पाहून बसला धक्का

आकाशात हजारो फूटांवरुन उड्डाण करणाऱ्या विमानावर अचानक वीज कोसळल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नक्कीच घाबरवणारा आहे. या विमानात चारशेहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. तेव्हा त्यावर अचानक वीज कोसळते...

Video | जेव्हा हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानावर अचानक कोसळली वीज, निसर्गाचे भयंकर रुप पाहून बसला धक्का
(plane struck by lightning
| Updated on: Mar 10, 2024 | 8:57 PM
Share

नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : अनेकदा निसर्गाचे रौद्र रुप पाहून माणूस निसर्गासमोर किती हतबल आहे हे आपल्या लक्षात येते. इंटरनेटवर असे अनेक व्हिडीओ समोर येतात ते पाहून आपण अचंबित होतो. असाच एक निसर्गाच्या भयंकर रुपाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विमानाने अवकाशात झेप घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर अचानक या विमानावर वीज कोसळताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूपच थरकाप उडविणारा आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला एक दशलक्ष युजर्सनी आतापर्यंत पाहीले आहे.

हा व्हिडीओ एअर कॅनडा बोईंग 777 या विमानाचा असल्याचे म्हटले जात आहे. जेव्हा एअर कॅनडा बोईंग 777 वॅनकुवर ( वॅंकावूर ) येथून उड्डाण घेऊन आकाशात झेपावले होते तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तु्म्हाला पाहायला मिळेल की कसे टेकऑफ घेताच फ्लाईटवर अचानक वीज कोसळते. या व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. अनेक जणांना या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

या विमानात 400 प्रवासी होते

सोशल मिडीयावरील एक्स प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला @thenewarea51 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर झाला आहे. या व्हिडीओत आकाशात भरारी मारणाऱ्या विमानावर कशी आकाशातील वीज कोसळते ते दिसत आहे. विशेष म्हणजे एवढी वीज कोसळूनही या विमानातील प्रवासी सुखरुप आहेत. विमानाला काहीच झाले नाही.या विमानात चारशेहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. या विमानाने वॅंकानूर एअरपोर्टवरून लंडनच्या हिथ्रो एअर पोर्टसाठी उड्डाण घेतले होते. परंतू रस्त्यात हा प्रकार घडला.

निसर्गाचा हा अवतार पाहून लोक हबकले

केवळ 16 सेंकदाच्या या व्हिडीओला आता पर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहीले आहे. युजर निरनिराळ्या प्रतिक्रीया देत आहेत. एका युजरने लिहीलेय की आता काही वेळासाठी पायलटला कॉफीची गरज लागणार नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटले की हा प्रकार धक्कादायक आणि भीतीदायक आहे. तर एका युजरने म्हटले की बरे झाले आता बॅटरी चार्ज झाल्या असतील. वास्तविक विमानावर वीज कोसळली तरी त्यास काही फरक पडत नाही. कारण विमानाचा बाह्य आवरण कार्बनपासून तयार केलेले असते. वीजेला रोखण्यासाठी तांब्याचा पातळ थर तयार केलेला असतो. जो विमानाच्या चारी बाजूंना असतो. परंतू वीज कोसळल्याचा आवाज मात्र प्रवाशा ऐकायला येऊ शकतो.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.