AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपोलियन कुठल्या युद्धात मारला गेला, विद्यार्थी म्हणतो, शेवटच्या युद्धात, वाचा क्रिएटीव्ह विद्यार्थ्याची भन्नाट उत्तरं!

व्हायरल होत असलेल्या फोटोत एका विद्यार्थ्याने प्रश्नांची उत्तरे इतक्या कल्पक पद्धतीने दिली की हा फोटो व्हायरल झाला. मुलाने आपले उत्तर अशा प्रकारे लिहिले आहे, ज्याला बरोबर किंवा चुकीचे म्हणता येणार नाही आणि सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे ही उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यापेक्षा जास्त मजेशीर काम केले आहे.

नेपोलियन कुठल्या युद्धात मारला गेला, विद्यार्थी म्हणतो, शेवटच्या युद्धात, वाचा क्रिएटीव्ह विद्यार्थ्याची भन्नाट उत्तरं!
परीक्षेत दिलेली क्रिएटीव्ह उत्तरं
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 5:24 PM
Share

शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. पहिले जे जिद्दीने अभ्यास करणारे, आणि दुसरे ज्यांना अजिबात अभ्यास करावासा वाटत नाही. याशिवाय काही असतात ज्यांना फक्त परीक्षेत पास व्हायचं असतं. पण याशिवायही कल्पक प्रकारातले विद्यार्थीही असतात, जे प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवं शोधतात. सध्या अशाच एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवारणार नाही. पण, इतकी कल्पक उत्तरं दिल्याबद्दल तुम्हाला या विद्यार्थ्याचं कौतुकंही वाटेल. (Viral Photo Student give creative answer on exam and also give funny remark on it people will laugh on it Funny Answers)

व्हायरल होत असलेल्या फोटोत एका विद्यार्थ्याने प्रश्नांची उत्तरे इतक्या कल्पक पद्धतीने दिली की हा फोटो व्हायरल झाला. मुलाने आपले उत्तर अशा प्रकारे लिहिले आहे, ज्याला बरोबर किंवा चुकीचे म्हणता येणार नाही आणि सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे ही उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यापेक्षा जास्त मजेशीर काम केले आहे. त्याला नापास करण्यासोबतच त्याच्या क्रिएटीव्हीटीचंही शिक्षकाने कौतुक केलं आहे.

हा फोटो पाहा

प्रश्न: नेपोलियन कोणत्या युद्धात मारला गेला? उत्तर – त्याच्या शेवटच्या युद्धात.

प्रश्न- स्वातंत्र्याच्या घोषणेवर कुठे स्वाक्षरी झाली? उत्तर – पानाच्या शेवटी.

प्रश्न- रावी नदी कोणत्या ‘स्टेट’मध्ये वाहते? उत्तर- लिक्विड स्टेटमध्ये.

प्रश्न- घटस्फोटाचं मुख्य कारण काय आहे? उत्तरः लग्न.

या थेट प्रश्नांची अशी मजेशीर उत्तरे वाचून तुमचे हसू आवरता येणार नाही, पण या फोटोत शिक्षकाने जे केले ते आणखी मजेदार आहे, ते पाहूनही हसू आवरता येणार नाही. सोशल मीडियावर हा फोटो पाहून लोक तो शेअर करत आहेत. ही पोस्ट पाहून लोक म्हणाले की ही मुलं कुठे आहेत? त्याच वेळी, काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले की मुलाचे उत्तर चुकीचं म्हणता येणार नाही.

हेही पाहा:

Viral Video: लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला, त्याला फास बसला, आणि त्यानंतर जे घडलं त्याने नेटकरी अवाक!

Video: 12 व्या मजल्यावर लिफ्ट अडकली, लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी चिमुरड्याचा तासभर संघर्ष, यूपीतील घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

 

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.