AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोली के पीछे क्या है… गाण्यावर नवरदेव नाच नाच नाचला इतका की लग्नच मोडलं… काय घडलं बुवा?

एक तरुणाला त्याच्या लग्नात "चोली के पीछे क्या है" या गाण्यावर डान्स केल्यामुळे लग्नाला मुकावे लागले. त्याच्या मित्रांच्या हट्टावर तो नाचला आणि सासऱ्यांना हे आवडले नाही. त्याच्या सासऱ्याने संतापाच्या भरात लग्न रद्द केले. नवरदेव ज्या पद्धतीने नाचत होता, तो प्रकारच त्यांना अपमानास्पद वाटला. त्यामुळेच त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

चोली के पीछे क्या है… गाण्यावर नवरदेव नाच नाच नाचला इतका की लग्नच मोडलं... काय घडलं बुवा?
नवरदेव इतका नाचला की लग्नच मोडलं.
| Updated on: Feb 03, 2025 | 5:54 PM
Share

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. या निमित्ताने नात्यागोत्यातील सर्व पाहुण्यांना भेटता येतं. त्यांच्याशी बोलता येतं. शिवाय लग्नानंतर प्रत्येकाचं दुसरं आयुष्य सुरू होत असतं. त्यामुळेच आपला विवाह सोहळा अविस्मरणयी करण्यासाठी प्रत्येकाचे फंडे सुरू असतात. कोणी लग्नाची विशेष थीम ठेवतं, तर कोणी डेस्टिनेशन वेडिंगवर भर देतं. तर कुणी साधच लग्न करतात, पण त्यातही वेगळेपण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. दिल्लीतील एका अति उत्साही तरुणाला मात्र लग्नातील उतावीळपणा चांगलाच नडला आहे. एका गाण्यामुळे या नवरोबाचं लग्नच मोडलं आहे.

हा नवरदेव वरात घेऊन नवरीच्या मंडपात आला होता. त्याचे मित्र मंडळीही सोबत होते. त्यावेळी या मित्राने नवरदेवाला चोली के पीछे क्या है या गाण्यावर डान्स करण्याचा हट्ट धरला. मित्रांचा हट्ट त्याला मोडता आला नाही. यावेळी नवरदेवानेही मित्रांसोबत जोरदार डान्स केला. नवरदेवाचा हा डान्सच नेमका त्याच्या सासऱ्याला खटकला.

नवरदेवाची खिल्ली उडवली

नवरदेवाचा हा डान्स पाहून वऱ्हाडी मंडळी आणि पाहुण्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. नवरदेवाची सर्वचजण खिल्ली उडवत असल्याचं नवरीच्या वडिलांनी पाहिलं. त्यांना हा प्रकार बिलकूल आवडला नाही. त्यांनी हा घोर अपमान वाटला. नवरदेवाचं अशा प्रकारे डान्स करणं आणि त्यावर इतरांनी त्याची खिल्ली उडवणं हे नवरीच्या बापाच्या मनाला इतकं लागलं की त्यांनी लग्नच मोडीत काढलं. ही घटना 16 जानेवारीची असल्याचं सांगितली जाते. नवरदेवाच्या डान्सचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवरीचा बाप काय म्हणाला?

वडिलांचा निर्णय ऐकल्यावर नवरीला तर रडूच कोसळलं. तर दुसरीकडे नवरदेवानेही भावी सासऱ्याची माफी मागून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण नवरीच्या वडिलाने कुणाचंच ऐकलं नाही. त्यांनी लग्न रद्दच करून टाकलं. नवरदेवाच्या या वेडगळपणाच्या नृत्यामुळे कुटुंबाच्या सन्मानावर लोक सवाल करतील, असं नवरीच्या वडिलांचं म्हणणं होतं.

खरं तर अशा प्रकारे लग्न रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही अशी प्रकरणे उजेडात आली आहेत. गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. चंदौली येथे लग्नात जेवण वाढण्यासाठी उशीर झाला म्हणून नवरदेव भडकला आणि त्याने थेट लग्नच मोडलं. त्यानंतर त्याने घरी येऊन नात्यातील मुलीशी निकाह लावला होता. हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर त्याने नवरीकडच्यांना आर्थिक भरपाई करून दिली होती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.