AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsAppच्या GIF मधील ही चिमुकली माहितीये? मीम्सच्या दुनियेतील लोकप्रिय Kailia Poseyची वयाच्या 16 वर्षी आत्महत्या

Kailia Posey : किलीया पोसी हिच्या चाहत्यांसाठी एक दुख:ची बातमी आहे. किलीया पोसीने आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने आपलं जीवन संपवलं आहे. तिच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. तिच्या निधनावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

WhatsAppच्या GIF मधील ही चिमुकली माहितीये? मीम्सच्या दुनियेतील लोकप्रिय Kailia Poseyची वयाच्या 16 वर्षी आत्महत्या
Kailia Posey
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 06, 2022 | 11:49 AM
Share

मुंबई : आपण सगळेच Whatsapp चॅटिंग करताना GIF वापरतो. यात आपण काही ठराविक GIF आपण वारंवार वापरतो. यातलं एक GIF सगळेच आवडीने वापरतात ते म्हणजे निळ्या रंगाचा टॉप घातलेली पाच-सहा वर्षांची मुलगी हसते आणि आपल्या डाव्या बाजूला बघते. हे GIF आहे, किलीया पोसी (Kailia Posey) हिचं. पण किलीया पोसी हिच्या चाहत्यांसाठी एक दुख:ची बातमी आहे. किलीया पोसीने आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने आपलं जीवन संपवलं आहे.

किलीया पोसीची आत्महत्या

किलीया पोसी हिच्या चाहत्यांसाठी एक दुख:ची बातमी आहे. किलीया पोसीने आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने आपलं जीवन संपवलं आहे. तिच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. तिच्या निधनावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हे GIF बनलं कसं?

‘टॉडलर्स अँड टियारास’च्या कार्यक्रमामध्ये हसताना कॅमेऱ्यात किलीया पोसी कैद झाली. तिच्या हसण्याने तीने अनेकांचं लक्ष वेधलं. तिच्या या गोड हसण्याचं GIF बनलं आणि ती लोकप्रिय झाली. तिच्या हसण्याने अनेकांच्या भावनांना ‘चेहरा’ दिला. तिने मागच्या वर्षी मिस लिंडन टीन यूएसएचा किताब जिंकला होता.

किलीयाचं करिअर

किलीयाने 2018 च्या नेटफ्लिक्सवरच्या ‘एली’या चित्रपटात अॅग्नेसची भूमिका साकारली होती. तिने ‘टॉडलर्स अँड टियाराज’ या मालिकेत आईसोबत काम केलं. काही दिवसांपूर्वी तिने एक खतरनाक स्टंट केला होता. जमॅका इथल्या ओचो रियोस इथे स्टंट करतानाचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती टेकडीवरुन पाण्यात उडी मारताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by kailia (@kailiaposey)

 पोसी कुटुंबियांचा संदेश

किलीयाच्या जाण्याने तिच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसलाय. त्यांनी किलीयाच्या चाहत्यांसाठी एक संदेश प्रसिद्ध केल आहे. पोसी कुटुंबीयांनी सांगितले की, ‘किलीया ही एक कर्तबगार मुलगी होती. तिने आपल्या कामगिरीच्या जोरावर नाव कमावलं. तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण तिने आपली जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय खूप लवकर घेतला. तिच्या जाण्याने आम्हाला अतिव दुख: झालं आहे. आम्हाला काही काळासाठी एकांत हवा आहे.”

View this post on Instagram

A post shared by kailia (@kailiaposey)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ