AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय बोलायचं तुम्हीच सांगा? भिकाऱ्यासोबत पळाली 6 मुलांची आई, कारण वाचून हैराण व्हाल

हरदोई जिल्ह्यातील एका 36 वर्षीय महिला आपला नवरा आणि सहा मुलांना सोडून एका भिकाऱ्यासोबत पळून जाण्याची घटना घडली आहे. तिच्या नवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, नंतर पोलिसांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, महिला आपल्या नातेवाईकाकडे गेली होती आणि तिच्यावर तिच्या नवऱ्याने अत्याचार केला होता.

काय बोलायचं तुम्हीच सांगा? भिकाऱ्यासोबत पळाली 6 मुलांची आई, कारण वाचून हैराण व्हाल
Uttar PradeshImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 08, 2025 | 7:17 PM
Share

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एक 36 वर्षीय महिला नवरा आणि सहा मुलांना सोडून एका भिकाऱ्यासोबत पळून गेली आहे. त्यामुळे तिचा नवरा चांगलाचा हादरून गेला आहे. तिच्या नवऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 67 अन्वये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीचं अपहरण झाल्याचा दावा त्याने या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या व्यक्तीच्या पत्नीचा आणि भिकाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पळून गेलेल्या महिलेच्या नवऱ्याचं नाव राजू असं आहे. तो 45 वर्षाचा आहे. त्याने याप्रकरणाची माहिती दिली. पत्नी राजेश्वरी आणि सहा मुलांसोबत तो हरदोईच्या हरपालपूर परिसरात तो राहतो. नन्हे पंडित नावाचा भिकारी कधी कधी आमच्या इकडे भीक मागायला यायचा. तो नेहमीच राजेश्वरीशी बोलायचा. दोघं फोनवरही बोलायचे. त्यामुळे ती त्याच्यासोबतच पळून गेल्याचं सांगत राजू याने याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

नन्हे पंडित घेऊन पळाला

3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास माझी पत्नी राजेश्वरीने आमची मुलगी खुशबूला सांगितले की, ती कपडे आणि भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहे. पण त्यानंतर ती परत आलीच नाही. मी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. ती सापडली नाही. माझ्या बायकोने म्हैस विकून आलेले पैसेही लंपास केले आहेत. एकूण 1 लाख 60 हजार रुपये घेऊन ती घरातून पळाली आहे. नन्हे पंडितच तिला घेऊन पळाला असावा असा संशय राजू याने व्यक्त केला आहे.

दोघांचे मोबाईल बंद

दरम्यान, हरपालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजदेव मिश्रा म्हणाले की, राजू नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी भिकाऱ्याने पळवून नेल्याची तक्रार केली आहे. घरातील पैसेही ती घेऊन पळाली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दोघे पळून गेल्यापासून त्यांचे मोबाईल नंबर बंद आहेत. आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत. आम्हाला सहा मुले आहेत. तरीही माझ्या बायकोला फूस लावून भिकारी घेऊन गेला आहे, असं राजूने सांगितलं.

सत्य काय?

दरम्यान, या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून माहिती दिली आहे. ही महिला भिकाऱ्यासोबत पळून गेली नव्हती तर ती तिच्या नातेवाईकाच्या घरी गेली होती. तिचा नवरा तिला मारझोड करत असल्याने ती घर सोडून गेली होती. महिला कुणासोबत तरी पळून गेल्याची चर्चा खोटी असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.