VIDEO | ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना घाणेरडे मेसेज, महिलेकडून बॉसची चांगलीच धुलाई, व्हिडीओ व्हायरल

ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना घाणेरडे मेसेज पाठवणाऱ्या बॉसची एका महिला कर्मचाऱ्याने चांगलीच धुलाई केली. (Woman Beaten Her Boss Video Viral)

VIDEO | ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना घाणेरडे मेसेज, महिलेकडून बॉसची चांगलीच धुलाई, व्हिडीओ व्हायरल
Woman Beaten Her Boss
Namrata Patil

|

Apr 15, 2021 | 3:07 PM

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना घाणेरडे मेसेज पाठवणाऱ्या बॉसची एका महिला कर्मचाऱ्याने चांगलीच धुलाई केली. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या महिला कर्मचाऱ्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ त्या पीडित महिलेने स्वत: शूट केला आहे. तसेच त्यात तिने तिच्या बॉसवर गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचे बोललं जात आहे. (Woman Beaten Her Boss Video Viral On Social Media)

महिला कर्मचाऱ्याकडून चांगलीच धुलाई 

चीनमधील मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या महिला सरकारी कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, तिचा बॉस तिला नेहमी त्रास देत असे. तो तिला नेहमी अश्लील संदेश पाठवत असते. यामुळे संतापलेल्या महिला कर्मचाऱ्याने तिच्या बॉसला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची चांगलीच धुलाई केली. या सर्व घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत जोऊ (Zhou) ही महिला वँग (Wang) नावाच्या बॉसच्या केबिनमध्ये संतापलेल्या अवस्थेत जाते. त्यानंतर तिकडे जाऊन ती महिला एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्या तोंडावर फेकते. यानंतर तिच्या मागे पडलेला झाडू घेऊन ती बॉसला मारहाण करण्यास सुरुवात करते. यानंतर जोऊ बॉसच्या समोर असलेली पुस्तकही त्याच्या दिशेने भिरकवते. त्यानंतर झाडूने त्याची चांगलीच धुलाई करते. या धुलाईचा व्हिडीओही ती रेकॉर्ड करते.

बॉसकडून चेहरा लपवत माफी 

त्यावेळी वँग हा स्वत:चा चेहरा लपवत तिची माफी मागतो. मी केवळ विनोद म्हणून तुला मॅसेज केला होता. यावर समोर उभी असलेली महिला हा विनोद कसा काय असू शकतो? असा प्रश्न त्याला विचारते. यावरुन तुझे चरित्र घाणेरडे आहे, असे स्पष्ट दिसते. तू कधी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा विचार केलास का? असा प्रश्नही ती विचारते.

14 मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल 

हा सर्व व्हिडीओ 14 मिनिटाचा आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या महिलेचे कौतुक करत तिला शाबासकी दिली आहे. तर काहींनी अशा लोकांना हीच शिक्षा मिळायला हवी, अशा कमेंट्सही केल्या आहेत. (Woman Beaten Her Boss Video Viral On Social Media)

संबंधित बातम्या :

Video | आधी बर्फावर रॅम्प वॉक, नंतर असं घडलं की मध्येच वाघाची शिट्टी गुल; पाहा व्हिडीओ

Fact Check | मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?

साडे 7 लाख रुपयांच्या बक्षिसासाठी धोकादायक सापांमध्ये बसला, पुढे काय झालं? पाहा Viral Video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें