वाह रे बुलेट महिला! काय तो आत्मविश्वास, काय ती स्टाईल!
लेहंगा घातलेली देसी स्टाईल महिला ही बुलेट चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

बुलेटचे अनेक व्हिडिओ समोर येत असले तरी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण एक महिला लेहेंगा घालून बुलेट चालवतीये आणि तिच्या मागेही एक महिला बसलीये जिने सुद्धा लेहेंगाच घातलेला आहे. एखाद्या महिलेला जीन्स घालून बुलेट चालवणं सुद्धा जड जातं महिलांमध्ये बुलेट चालविण्याचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे लोक हा व्हिडीओ बघून आश्चर्यचकित झालेत.
खरंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लेहंगा घातलेली देसी स्टाईल महिला ही बुलेट चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कपाळावर टिका, डोक्यावर हलका पदर आणि चेहऱ्यावर हास्य असलेली ही महिला बेफिकीर होऊन बुलेट चालवतेय. त्याचप्रमाणे मागे बसलेली महिला सुद्धा असाच लेहेंगा घालून आहे.
या व्हिडिओची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही महिला ज्या पद्धतीने ही बुलेट चालवत आहे ती पाहण्यासारखी आहे. तिचा आत्मविश्वास जबरदस्त दिसतो.
View this post on Instagram
या स्टाइलमध्ये बुलेट दिसल्यावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. बाईचा आत्मविश्वास आणि बुलेटचा वेग पाहून बघणारे बघतच राहिले आणि ती बाई गाडी चालवतच राहिल्या.
कुणीतरी या बुलेट चालवतानाचा व्हिडीओ त्याचवेळी बनवला. व्हिडिओ पाहून असं वाटतं की, ही महिला बुलेट चालवत असताना त्याच वेळी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे आणि ज्या व्यक्तीनं व्हिडीओ बनवला आहे ती व्यक्तीही बाईकवरुन स्वार होत आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आणि लोक तो जोरदार शेअर करत आहेत.
