AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्हाला खळखळून हसायला लावणारा आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांची चांगलीच फजिती झाली आहे.

Video | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल
WOMAN VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 11:25 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. या मंचावर आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी समोर येतात. काही गोष्टी तर आश्चर्यकारक आणि हसायला लावणाऱ्या असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्हाला खळखळून हसायला लावणारा आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांची चांगलीच फजिती झाली आहे. (women wearing burkha fell down while walking video went viral on social media)

दोन महिला उतारावरुन चालत आहेत

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही मोजक्याच व्हिडीओंची चर्चा होत असते. सध्या चर्चा होत असलेला व्हिडीओ हा दोन महिलांचा आहे. या व्हिडीओमधील महिलांसोबत जे झालं ते पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. या व्हिडीओमध्ये दोन महिला हातात हात धरून उतारावरून चालताना दिसत आहेत. या दोन्ही महिलांनी बुरखा घातलेला असून त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाहीये. व्हिडीओमध्ये त्यांची पाठमोरी आकृती दिसत आहे.

चालण्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न

या दोन्ही महिला सुरुवातीला एकमेकींचा हात धरुन चालत आहेत. त्या अगदी हळूहळू पाऊल टाकत आहेत. मात्र, उतार जास्त असल्यामुळे या महिलांच्या चालण्याचा वेग आपोआपच वाढत आहे. चालण्याचा वेग कमी करण्याचा त्या पुरेपूर प्रयत्न करत आहेत. मात्र, ते शक्य होत नाहीये.

शेवटी दोन्ही महिला तोंडावर पडल्या

शेवटी या दोन्ही महिला उतारावरुन थेट पळताना दिसत आहेत. त्यांचे आपल्या पायांवरचे नियंत्रण पूर्णुपणे सुटले असून  त्यांनी एकमेकींचे हात सोडले आहेत. या महिला उतारावरुन अगदीच जोरात पळत असून शेवटी उतार संपल्यानंतर तोंडावर पडल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये त्यांची चांगलीच फजिती झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, त्याला jaat_k_jokes या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत असून त्याला आपल्या पर्सनल अकाऊंटवरुन शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | कपडे धुताना महिला गोड लाजली, नेटकऱ्यांच्या काळजाचं पाणी, सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | इंजेक्शन घेणार नाही म्हणत आजोबा पळाले, नंतर नर्सने जे केलं ते एकदा बघाच !

Video | बेशुद्ध अवस्थेत खाली पडला, नंतर अचानकपणे लागला नाचायला, हा अजब गजब व्हिडीओ एकदा पाहाच

(women wearing burkha fell down while walking video went viral on social media)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.