गॅरंटीने दुप्पट पैसे मिळवून देणारी पोस्टाची योजना; गुंतवणूक करताना या योजनेचा अवश्य विचार करा

जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीची योजना आखत असाल आणि तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही सध्याच्या घडीला पोस्ट ऑफिसच्या 'किसान विकास पत्र' योजनेत गुंतवणूक करू शकता. (A postal plan that doubles the guarantee; Be sure to consider this plan when investing)

गॅरंटीने दुप्पट पैसे मिळवून देणारी पोस्टाची योजना; गुंतवणूक करताना या योजनेचा अवश्य विचार करा
गॅरंटीने दुप्पट पैसे मिळवून देणारी पोस्टाची योजना
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 7:06 AM

नवी दिल्ली : पैसे वाचवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या पैशांची योग्य ठिकाणी, योग्य योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. भविष्याचा विचार करता अशी गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. बरेच लोक बचत करतात, पण ते फायदेशीर योजनेचा शोध घेऊन गुंतवणूक करत नाहीत. बरेच लोक गुंतवणूक करतात परंतु अशी योजना निवडतात, ज्यामधून त्यांना चांगला परतावा मिळत नाही. सारासार विचार न करता केलेली गुंतवणूक अधिक फायदा मिळवून देण्याऐवजी नुकसानकारक ठरते, अनेक वेळा अशा अविचारी गुंतवणुकीमध्ये पैसे पूर्णपणे बुडतात. याचे कारण असे की त्यांनी अशी योजना निवडली, जी बाजाराच्या अस्थिरतेशी संबंधित असते. (A postal plan that doubles the guarantee; Be sure to consider this plan when investing)

खाजगी कंपन्यांच्या आमिषांना बळी पडू नका

जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीची योजना आखत असाल आणि तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही सध्याच्या घडीला पोस्ट ऑफिसच्या ‘किसान विकास पत्र’ योजनेत गुंतवणूक करू शकता. ही एक सरकारी योजना आहे आणि त्यात गुंतवणूक करून आपण हमीभावाने आपले पैसे दुप्पट करू शकता. इतर कुठल्या खाजगी कंपन्यांच्या आमिषांना बळी पडून पैसे बुडवण्यापेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा विचार करणे केव्हाही चांगले ठरू शकेल.

किमान एक हजार रुपये गुंतवून योजनेचा लाभ घेता येतो

किसान विकास पत्र या योजनेच्या अटींविषयी बोलायचे झाल्यास, तुम्ही या योजनेत किमान एक हजार रुपये गुंतवून योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात करू शकता. ग्राहकांना जास्तीत जास्त पैसे गुंतवायचे असतील, तर त्याला काहीही मर्यादा नाही. या योजनेंन्तर्गत तुम्ही 1000, 5000 रुपये, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतची प्रमाणपत्रे खरेदी करून पैशांची गुंतवणूक करू शकाल.

10 वर्षांत पैसे होतात दुप्पट

ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे. म्हणजेच तुम्हाला एकदा पैसे भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला सुमारे 10 वर्षांनंतर दुप्पट परतावा मिळेल. या योजनेंतर्गत दर तिमाहीवर व्याज दर निश्चित केला जातो. सध्या या योजनेला 6.9 टक्के दराने व्याज मिळत आहे. जर तुम्ही त्यात आजच्या घडीला अडीच लाख रुपये जमा केले तर दहा वर्षानंतर तुम्हाला दुप्पट रिटर्न मिळेल म्हणजे 5 लाख रुपये मिळतील. सध्या कोरोना महामारीने आपल्याला गुंतवणुकीचे महत्व कळले आहे. त्यामुळे अनेक जण गुंतवणुकीकडे वळले आहेत. ही गुंतवणूक करताना ‘किसान विकास पत्र’ सारख्या सरकारी योजनेची निवड करायला पाहिजे. (A postal plan that doubles the guarantee; Be sure to consider this plan when investing)

इतर बातम्या

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

लॉकडाऊन काळातही देशात दुचाकींची जोरदार विक्री, ‘या’ 5 गाड्यांना सर्वाधिक पसंती

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.