बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आजच करा पूर्ण; जूनमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद, चेक करा सुट्यांची यादी

जूनमध्ये बँका तब्बल बारा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर सुट्यांची यादी चेक करूनच बँकेत जावे. त्यामुळे तुमचा पैसा आणि वेळ दोन्हीचीही बचत होईल.

बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आजच करा पूर्ण; जूनमध्ये 'इतक्या' दिवस बँका राहणार बंद, चेक करा सुट्यांची यादी
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 2:16 PM

मुंबई : जून (June) महिना सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जूनमध्ये ज्यांना बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जूनमध्ये बँका तब्बल (Bank holidays) 12 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचे बँकेत (Bank) काही काम असेल तर मे महिन्यातच पूर्ण करून घ्या. किंवा जूनमध्ये तुम्हाला बँकेत जाण्याची वेळ आली तर त्यापूर्वी बँकेच्या सुट्यांचे वेळापत्रक एकदा आवश्य चेक करा. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून वर्षाच्या सुरुवातीलाच सुट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत असते. या सुट्यांमध्ये शनिवार, रविवार या आठवडी सुट्यांसोबतच सण उत्सवांच्या काळातील बँकांच्या सुट्यांची लिस्ट असते. या सुट्यांव्यतिरिक्त काही वेळेला त्या -त्या राज्यात बँकाना स्पेशल सुट्या देखील देण्यात येतात. आरबीआयने जारी केलेल्या यादीनुसार पुढच्या महिन्यात बँका बारा दिवस बंद राहणार आहेत.

या दिवशी बँक राहणार बंद

जून महिन्यात बँकांना बारा दिवस सुटी आहे. त्यामध्ये 2 जून रोजी महाराणा प्रताप जयंती असल्याने बँका बंद राहणार आहेत. 3 जून रोजी श्री गुरु अर्जुन देवजी यांचा हुतात्मा दिवस आहे. यानिमत्त पंजाबमध्ये विशेष सुटी असेल. 5 जून रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुटी आहे. 11 जून रोजी दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. 12 जून रोजी रविवारची साप्ताहिक सुटी असेल. 14 जून रोजी संत गुरू कबीर जयंती असल्याने यानिमित्त ओडिशा, चंदीगढ, हिमाचल प्रदेश आणि हरियाणासह पंजाबमधील बँकां बंद राहणार आहेत. 15 जून रोजी विशेष सुटीनिमित्त ओरिसा, मिझोराम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहणार आहेत. 19 जून रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुटी आहे, या दिवशी बँका बंद राहातील. 22 जून रोजी खार पूजेनिमित्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहणार आहेत. 25 जून रोजी चैथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर 26 जून रोजी रविवारी साप्ताहिक सुटी आहे. 30 जून रोजी मिझोरममध्ये बँकांना विशेष सुटी असल्याने बँका बंद राहणार आहेत.

स्पेशल सुटी

आरबीआयकडून चालू वर्षात बँकांना किती सुट्या आहेत. याबाबत वर्षाच्या सुरुवातीलाच एक परिपत्रक काढले जाते. यामध्ये सर्व सुट्यांचा समावेश असतो. स्पेशल सुट्या म्हणजे अशा सुट्या असतात की, त्या-त्या राज्यातील एखाद्या प्रसिद्ध उत्सवाच्या निमित्ताने दिल्या जातात. अशा सुट्या संबंधित राज्यापुरत्याच मर्यादीत असतात. म्हणजेच अशी एखादी सुटी जर महाराष्ट्रात असेल तर ती सुटी उत्तर प्रदेशमध्ये असेलच असे नाही.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.