AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पासपोर्ट बनविताना सावधान, केंद्र सरकारने जारी केले आदेश

परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट सर्वात महत्वाचा सरकारी दस्ताऐवज आहे. ऑनलाईन पासपोर्ट काढणाऱ्यांना सरकारने सावध केले आहे.

पासपोर्ट बनविताना  सावधान, केंद्र सरकारने जारी केले आदेश
passport-SevaImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 21, 2023 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली : जर तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारने पासपोर्ट बनविणाऱ्यासाठी महत्वाची सूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने सोमवारी एक आदेश जारी करीत म्हटले आहे की नागरीकांनी पासपोर्ट बनविताना बेकायदा वेबसाईटपासून सावधान राहीले पाहिजे. काही बनावट वेबसाईट आणि वेबपोर्टल नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या वेबसाईट नागरिकांचा डेटा जमा करीत आहेत. तसेच आर्थिक फसवणूकही करीत असल्याचे सरकारने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.

परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट सर्वात महत्वाचा सरकारी दस्ताऐवज आहे, पासपोर्ट शिवाय तुम्हाला व्हिसा मिळू शकत नाही आणि नंतर तुम्ही पासपोर्ट शिवाय परदेशात प्रवास देखील करू शकत नाही. पासपोर्ट हे पॅनकार्ड आणि आधार कार्ड सारखेच महत्वाचे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे ज्याची आपल्याला परदेशातील प्रवासासाठी खूप गरज असते.

पूर्वी पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया खूपच वेळखाऊ होती. आता पासपोर्ट मिळणे खूप सोपे झाले आहे. आता सरकारने पासपोर्ट मिळण्याची सुविधा ऑनलाईन केली आहे. त्यामुळे वारंवार पासपोर्ट कार्यालयात जाण्याची काहीही गरज राहणार नाही.  अजूनही अनेक लोकांकडे पासपोर्ट नसल्याने ते लोक कोणतीही माहीती नसल्याने ते अशा बोगस वेबसाईटच्या आहारी जाऊ शकतात, त्यामुळे सरकारने सावधान केले आहे.  आता घरी बसून पासपोर्ट मिळवू पाहणारे अशा बोगस वेबसाईटच्या जाळ्यात येऊ नयेत यासाठी ऑनलाइन पासपोर्ट कसा काढायचा यासाठी अधिकृत वेबसाईटची माहिती असणे गरजेचे आहे.

पासपोर्ट काढण्याचे काम आता ऑनलाईन होत असल्याचा फायदा घेत काही जण बनावट वेबसाईट आणि वेबपोर्टल बनवून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच पासपोर्ट सेवेसाठी भेटण्याची वेळ ठरविण्यासाठी भरमसाठ शुल्कही आकारले जात आहे. यातील काही वेबसाईट ओआरजी डोमेन नावांनी रजिस्टर आहेत. काही आयएन आणि काही डॉट कॉम नावांनी रजिस्टर असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. बोगस वेबसाईटची काही नावे….पुढील प्रमाणे आहेत. www.indiapassport.org

www.online-passportindia.com

www.passportindiaportal.in

www.passport-india.in

www.passport-seva.in

www.applypassport.org या सारख्या काही अन्य वेबसाईट देखील आहेत. या पासून नागरिकांनी सावधान राहीले पाहिजे असे सरकारने म्हटले आहे.

भारती पासपोर्ट आणि संबंधित सेवांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या धोकादायक बेवसाईटवर जाऊ नये. पासपोर्ट सेवेसाठी कोणतेही शुल्क भरू नये अन्यथा त्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

पासपोर्ट सेवेसाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक अधिकृत वेबसाईट आहे. पासपोर्ट ईंडीया डॉट जीओवी डॉटइन ज्याची लिंक अशी आहे. www.passportindia.gov.in पासपोर्ट सेवासाठी सरकारचे अधिकृत मोबाईल एप देखील आहे. ज्यांना एपआधारे पासपोर्ट करीता अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी मोबाईल एप एमपासपोर्टचा वापर करता येईल. जे एप एण्ड्रोईड आणि आयओएस एप्लिकेशन स्टोअर वरून डाऊनलोड करता येते.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.