Multibagger Share : छप्परफाडच! महारत्न कंपनीच्या शेअरमधील 1 लाखाचे झाले..

Multibagger Share : या महारत्न कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. त्यांनी संयम ठेवल्याने त्यांचा मोठा फायदा झाला. त्यांना जोरदार परतावा मिळाला. या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवल्यावर त्यांना इतक्या कोटींचा परतावा मिळाला.

Multibagger Share : छप्परफाडच! महारत्न कंपनीच्या शेअरमधील 1 लाखाचे झाले..
तगडी कमाई
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 7:08 PM

नवी दिल्ली : महारत्न कंपनी गेल इंडियाने (Gail India Share) कमाल केली. हा शेअर मल्टिबॅगर ठरला. या शेअरने गुंतवणूकदारांना (Investors) जोरदार परतावा दिला. या सरकारी कंपनीने शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून ज्यांनी संयम ठेवला, ते गुंतवणूकदार एकदम मालामाल झाले. गेल इंडियामध्ये शेअरधारकांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करुन सोडून दिली असती, तर ते आज कोट्यधीश असते. या एक लाख रुपयांचे आता 1.88 कोटी रुपये झाले असते. गुंतवणूकदारांना कंपनीने तगडा रिटर्न (Best Return) मिळवून दिला. बोनस शेअरमुळे गुंतवणूकदारांना हा फायदा झाला. गेल इंडियाने 2008 पासून आतापर्यंत शेअर होल्डर्सला 5 वेळा बोनस शेअर दिला आहे.

गेल इंडियाची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) 26 मे 2000 मध्ये नोंदणी झाली. त्यावेळी हा शेअर केवळ 4.38 रुपये होता. जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्याकडे 22,830 इतके शेअर असते. गेल इंडियाने 2008 पासून ते 2022 पर्यंत 5 वेळा बोनस जाहीर केला आहे. त्याचा फायदा बघता, गुंतवणूकदाराकडे एकूण 1,82,640 शेअर असते. 24 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसईवर हा शेअर 103.45 रुपयांवर बंद झाला. त्याआधारे या शेअरचे मूल्य 1.88 कोटी रुपये असते.

महारत्न कंपनी गेल इंडियाचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 5 टक्के जास्त तेजीने 103.45 रुपयावर पोहचला. शेअर बाजारात जोरदार चढउतार होत आहे. बाजार सतत हिंदोळ्यावर आहे. बाजाराची दिशा आणि दशा सर्वांनाच माहिती आहे. अशा ही काळात गेलच्या शेअरने 8 महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. जून 2022 नंतर या कंपनीचा शेअर पुन्हा एकदा उच्चांकावर पहोचला आहे. गेल इंडियाचा शेअर 19 एप्रिल 2022 रोजी 116 रुपयांवर होता. तो 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर होता.

हे सुद्धा वाचा

गेल इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 5 वेळा बोनस शेअर दिला आहे. सरकारी कंपनीने ऑक्टोबर 2008 मध्ये 1:2 प्रमाणात बोनस जाहीर केला होता. त्यानंतर कंपनीने मार्च 2017 मध्ये 1:3 प्रमाणात, मार्च 2018 मध्ये 1:3 प्रमाणात शेअर दिला होता. कंपनीने जुलै 2019 मध्ये 1:1 प्रमाणात गुंतवणूकदारांना बोनस शेअरचा फायदा दिला होता. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 1:2 प्रमाणात बोनस शेअरचा फायदा मिळवून दिला आहे.

आरएसीएल गियरटेक (RACL Geartech Ltd) या शेअरने दीर्घकालावधीत गुंतवणूकदारांना कमाल परतावा दिला आहे. हा शेअर मल्टिबॅगर (Multibagger Stock) ठरला. त्याने दीर्घकालीनच नाही तर शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही मालामाल केले आहे. हा शेअर 765.75 रुपयांवर बंद झाला. गेल्या दोन वर्षांत या शेअरने कमाल केली. दोन वर्षांनंतर गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 14 पट परतावा दिला आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरले आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.