AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकानांच्या छतावर सोलर पॅनल लावू शकतो का ? PM सुर्य घर योजनेचे नियम काय ?

पंतप्रधान सूर्य घर योजनेत सौर पॅनल छतावर लावून वीज मोफत मिळण्याची सोय असते. मात्र, दुकानदार त्यांच्या छतावर हा प्रकल्प राबवू शकतात का याविषयी प्रश्न केले जात आहेत. चला पाहूयात काय आहे ही योजना ?

दुकानांच्या छतावर सोलर पॅनल लावू शकतो का ? PM सुर्य घर योजनेचे नियम काय ?
PM Surya Ghar Yojana
| Updated on: Mar 02, 2026 | 6:20 PM
Share

उन्हाळा सुरु होत आहे. अशात वीजेची मागणी वाढणार आहे. खासकरुन ज्या घरात जास्त सदस्य असतात आणि कुटुंब मोठे असते त्यांच्याकडे वीजेची मागणी देखील जास्त असते. उन्हाळ्यात घरात पंखे, एसी, कुलर, फ्रिज आणि इतर वीजेची उपकरणे जास्त वापरली जातात. त्यामुळे महिन्याच्या शेवटी हाती विजेचे बिल येते तेव्हा रक्कम पाहून आपल्या चांगलाच घाम फुटतो. आता पंतप्रधान सुर्य घर योजना आल्याने अनेकजण घरावर सोलर छत लावत आहेत. विजेच्या बिलात त्यामुळे सुट मिळत असल्याने अनेक लोकांना ग्रामीण भागात हा सौदा फायद्याचा ठरत आहे. केंद्र सरकार या योजनेसाठी लोकांना प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकारची पीएम सुर्य घर मोफत वीज योजना नेमकी काय आहे त्यात केवळ घरांचा समावेश आहे की दुकानांचाही समावेश आहे या संदर्भात अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत.

या योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार सबसिडी देत असते. अनेकांच्या मनात प्रश्न आहेत की दुकानांच्या छतावर या योजनेत सोलर पॅनल लावता येतात का ? चला तर या संदर्भात नेमकी काय तरतूद आहे हे पाहूयात. पंतप्रधान सुर्यघर योजनेचे नियम नेमके काय आहेत हे पाहूयात…

दुकानाच्या छतावर सोलर पॅनल लावता येतात का ?

पंतप्रधान सूर्य घर योजनची व्याप्ती मुख्यत: निवासी म्हणजे घरांच्या पर्यंत मर्यादित आहे. सरकारच्या वतीने देण्यात येणारी सबसिडी केवळ त्याच लोकांना मिळते, ज्यांच्या नावावर स्वत: चे घर असते,तसेच ज्यांचे वीज कनेक्शन वैध असते. जर कोणा व्यक्तीच्या घरातच त्याचे छोटे दुकान असेल आणि वीज कनेक्शन देखील घरगुती असेल आणि तर तो स्वत:च्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावू शकतो आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो. परंतू जर दुकान संपूर्णपणे व्यावसायिक आहे आणि त्याने वेगळे स्वतंत्रपणे व्यावसायिक वीज कनेक्शन घेतले असेल तर या योजनेंतर्गत सबसिडी मिळण्यास तो पात्र नाही. या प्रकरणात तो दुकानदार स्वत:च्या दुकानावर सोलर पॅनल लावू शकतो. परंतू त्याचा खर्च त्याला स्वत:ला करावा लागणार आहे. सरकारची सबसिडी केवळ घरगुती ग्राहकांसाठीच आहे.

किती मिळते सबसिडी ?

पीएम सूर्य घर योजने अंतर्गत वेगवेगळ्या क्षमतेच्या सोलर सिस्टीमसाठी वेगवेगळी सबसिडी मिळते. उदा. १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३०,००० रुपये प्रति किलोवॅट, २ किलोवॅट प्रकल्पासाठी सुमारे ६०,००० रुपये आणि ३ किलोवॅट वा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पासाछी सुमारे ७८,००० रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. तसेच सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. इंस्टॉलेशन आणि वीज वितरण कंपनीच्या मंजूरीनंतर हा पैसा डीबीटी अंतर्गत पाठवला जातो.

पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर संबंधित वीज वितरण कंपनीकडून तांत्रिक मंजूरी घेतली जाते. तसेच इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर आणि तपासणी केल्यानंतर सबसिडी थेट बँकेच्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय या योजनेचा फायदा उचलण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:चे घर असणे गरजेचे आहे. त्यावर सोलर पॅनल लावण्याची जागा असावी आणि घरात वीजेचे वैध वीज कनेक्शन असायला हवे.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.