Gold New Rules : चकाकते ते सगळं सोनं नसते! सोने खरेदी-विक्रीचा बदलला नियम

Gold New Rules : सोन्याचे नियम आताच 1 एप्रिल रोजी लागू करण्यात आले होते. आता त्यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. हा बदलेला नियम तुम्हाला माहिती आहे का

Gold New Rules : चकाकते ते सगळं सोनं नसते! सोने खरेदी-विक्रीचा बदलला नियम
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 4:59 PM

नवी दिल्ली : देशातील ग्राहकांना शुद्ध सोने खरेदी करता यावे. त्यांची फसवणूक टळावी यासाठी सोन्याच्या हॉलमार्किंगचा (Gold Hallmarking) नियम आला. केंद्र सरकारने हा नियम लागू केला. देशभरात 1 एप्रिल 2023 पासून हा नियम लागू झाला. देशातील सोन्या,चांदीचे दुकानदार, सराफा, पेढीवाले यांना HUID Hallmarking चे दागिने, आभुषण विक्री करणे अनिवार्य करण्यात आले. जुने दागिने विक्री करण्यासाठी ते अगोदर हॉलमार्क करुन नंतरच विक्री करण्याचा नियम आला. पण आता 4 अंकी HUID चालणार नाही, काय बदल झाला ते घ्या जाणून…

बदलला सोने खरेदीचा नियम केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्क नियमांमध्ये बदल केला आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून 4 अंकांचे हॉलमार्क युनिक आयडी समाप्त केले आहेत. आता 1 एप्रिलपासून 4 अंकांच्या हॉलमार्क दागिन्यांची विक्री करता येणार नाही. त्यामुळे हॉलमार्कचे दागिने खरेदी करताना आता 4 अंकांच्या नव्हे तर 6 अंकी हॉलमार्क बघूनच दागिने खरेदी करणे आवश्यक आहे.

म्हणून हा हॉलमार्क पूर्णपणे बंद आतापर्यंत दोन प्रकारचे हॉलमार्क सुरु होते. एक 4 अंकी तर दुसरा 6 अंकांचा हॉलमार्क सुरु होता. पण त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होत होता. शुद्ध सोन्यासाठी दोन हॉलमार्कची गरज नसल्याने सरकारने त्यातील एक, 4 अंकांचा हॉलमार्क पूर्णपणे बंद केला. आता केवळ 6 अंकी हॉलमार्कचा वापर करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

हॉलमार्क क्रमांक अनिवार्य ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.

काय आहे हॉलमार्किंग

  1. हॉलमार्किंग हे सोन्याची शुद्धतेची हमी देते. प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क चिन्हांकित असतो. त्यामध्ये भारतीय मानक ब्यूरोचा (BIS) लोगो, त्याची शुद्धता याची माहिती अंकित असते. यासोबतच या सोन्याची शुद्धता तपासणी केंद्र आणि इतर माहिती चिन्हांकित असते. प्रत्येक दागिन्यात सोन्याची मात्रा वेगवेगळी असते. दागिन्याची शुद्धता कॅरेट आधारे निश्चित करण्यात येते.
  2. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 1 जुलै रोजी हॉलमार्किंगच्या नियमात बदल केला होता. हॉलमार्किंगच्या चिन्हांमध्ये बदल केला होता. चिन्हांची संख्या तीन केली होती. पहिले चिन्ह बीआयएस हॉलमार्कचे आहे. हे त्रिकोणी चिन्ह आहे. दुसरे चिन्ह सोन्याच्या शुद्धतेचे आहे. त्यामुळे सोने किती कॅरेटचे आहे, याची माहिती मिळते.
  3. तिसरे चिन्ह हे अल्फान्यूमेरिक कोड असते. हे संख्या आणि अक्षरांचं मिळून तयार झालेलं चिन्हं असते. त्याला HUID चिन्ह म्हणतात. या कोडमध्ये अक्षर आणि संख्येचा समावेश असतो. हॉलमार्किंगच्यावेळी ज्वेलर्सला हा क्रमांक देण्यात येतो. हा क्रमांक युनिक असतो.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.