AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card : आधार कार्डच्या मदतीने तपासा बँक खात्यातील रक्कम, असा घ्या या सेवेचा फायदा

Aadhaar Card : आधार कार्डचा केवळ ओळखपत्र म्हणूनच वापर होत नाही तर तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठीही तुम्हाला आधार कार्डची मदत घेता येते.

Aadhaar Card : आधार कार्डच्या मदतीने तपासा बँक खात्यातील रक्कम, असा घ्या या सेवेचा फायदा
| Updated on: Feb 05, 2023 | 10:10 PM
Share

नवी दिल्ली : सध्याच्या डिजिटल युगात आधार कार्ड (Aadhaar Card) भारतीय नागरिकांसाठी महत्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड सर्व सोयी-सुविधांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये बँकिंग आणि सरकारी सेवांचा समावेश आहे. आधार कार्डला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक लिंक असल्यास तुम्हाला मोठा फायदा होतो. तुम्हाला बँकेच्या खात्यातील (Bank Account) रक्कम तपासण्यासाठी बँकेत जाण्याची, एटीएमवर जाऊन खात्यातील रक्कम तपासण्याची गरज नाही. आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला बँक खात्यातील रक्कम (Balance) तपासता येते.

आधार कार्ड आता जवळपास सर्वच योजनांशी लिंक असते. या योजनेच्या अपडेट तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून कळतात. आधार कार्डवर प्रत्येक व्यक्तिचे नाव, जन्म तारीख, लिंग, घराचा पत्ता आणि फोटो असतो.

तुम्ही 12 आकड्यांचा आधार कार्ड क्रमांकाचा वापर करुन बँक खात्यातील बॅलन्स चेक करु शकता. त्यासाठी बँकेच्या शाखेत, एटीएमवर जाण्याची काहीच गरज नाही. घरबसल्या तुम्हाला खात्यातील रक्कम तपासता येते.

आधार कार्डच्या युझर्सला बँकेचे केवळ बॅलेन्सच चेक करता येत नाही, तर रक्कम ही दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करता येते. सरकारी मदतीसाठी विनंती पाठविता येते. तसेच पॅन कार्ड मिळविण्यासाठी आधारा कार्डचा वापर करता येतो.

बँक खात्यातील बॅलन्स तपासायचा असेल तर सोपी प्रक्रिया आहे. त्याआधारे तुम्हाला खात्यातील शिल्लक रक्कम तपासता येईल. सर्वात अगोदर वापरकर्त्याला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन *99*99*1#- यावर कॉल करावा लागेल.

हा क्रमांक डायल केल्यानंतर त्याच्या आधार कार्डाचे 12 आकडे टाकावे लागतील. त्यानंतर आधार क्रमांक पुन्हा टाकावा लागेल. हा क्रमांक व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर सर्वात शेवटी UIDAI च्या स्क्रीनवर तुम्हाला बँक बँलेन्स फ्लॅश एसएमएसच्या माध्यमातून दिसेल.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) अजून काही सेवांची घोषणा केली आहे. त्यानुसार, आधारच्या माध्यमातून इतर सेवा घरपोच देण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. लवकरच ग्राहकांना अनेक सेवा घरपोच मिळतील. यामध्ये आधारकार्डची माहिती अपडेट करता येणार आहे.

  1. MY Aadhaar पोर्टलवर ऑनलाईन पत्ता अपडेट करता येईल
  2. पत्ता अपडेट करण्यासाठीचा पर्याय निवडा
  3. कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाका
  4. प्रमाणित कागदपत्रे अपलोड करुन त्याचा पडताळा करा
  5. आता अर्जासोबत 50 रुपयांचे शुल्क जमा करा
  6. त्यानंतर SRN कुटुंब प्रमुखांसोबत शेअर करण्यात येईल
  7. कुटुंब प्रमुखाला याविषयीचा एसएमएस पाठविण्यात येईल
  8. 30 दिवसांच्या आत कुटुंब प्रमुखाला परवानगी देता येईल
  9. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.