Inflation : लवकरच ग्राहकांच्या माथी महागाईचा हप्ता; मे च्या अखेरीस टीव्ही आणि फ्रिज मिळणार चढ्या दामाने

Inflation : लवकरच ग्राहकांच्या माथी महागाईचा हप्ता; मे च्या अखेरीस टीव्ही आणि फ्रिज मिळणार चढ्या दामाने
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9

घरगुती इलेक्ट्रीक साहित्य उत्पादन करणा-या उद्योगाच्या मते, कच्चा माल आणि सुट्या भागांच्या किंमतीत अचानक झालेल्या वाढीमुळे या इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमती ही वाढू शकतात. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने ही किंमतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मेच्या अखेरीस घरातील टीव्ही, फ्रिजच्या किंमती वाढू शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

May 13, 2022 | 10:21 AM

मुंबई : महागाईने सर्व बाजूने हल्ला चढविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस, चाकरमानी बेजार झाला आहे. आता त्याच्या पदरात पुन्हा महागाईचा (Inflation) एक हप्ता चढविण्यात येणार आहे. अर्थात ही महागाई चैनीची वस्तू म्हणून ओळखल्या जाणा-या टीव्ही, फ्रिज (TV, Fridge) या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या (Electronics items) बाबतीत बोचणार आहे. घरात नवीन टीव्ही, फ्रिज घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा खिसा आता आणखी खाली होणार आहे. कच्चा मालाचे भाव वाढल्याने कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रिजच्या किंमती वाढणार आहेत. देशातील सरकारी वृत्तसंस्था पीटीआयने (PTI) याविषयीची माहिती दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने उत्पादित करणा-या उद्योगांच्या दाव्याआधारे पीटीआयने हे वृत्त दिले आहे. कच्चा माल आणि सुट्या भागांच्या किंमतीत अचानक झालेल्या वाढीमुळे या इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमती ही वाढू शकतात. तसेच डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया (Rupees) कमजोर झाल्याने ही किंमतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मेच्या अखेरीस घरातील टीव्ही, फ्रिजच्या किंमती वाढू शकतात.

किती वाढू शकतात किंमती

अहवालातील अंदाजानुसार, टीव्ही, फ्रिज आणि वाशिंग मशीनच्या किंमतीत पुढील एका महिन्यांत 3 ते 5 टक्के वाढ होऊ शकते. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लांएसेज मॅन्युफॅक्चर्रर्स चे अध्यक्ष एरिक ब्रगैंजा यांनी या दरवाढीमागची कारणमीमांसा केली आहे. त्यानुसार, कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला आहे. या वाढत्या दबावामुळे कच्च्या मालाच्या किंमती आणखी वाढल्या आहेत. आपल्याकडे जून महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादित वस्तूंच्या किंमतीत 3 ते 5 टक्के वाढ दिसून येईल. या अहवालानुसार इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सर्वच उत्पादनावर याचा परिणाम दिसून येईल आणि सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ दिसून येईल. यापूर्वी एसी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीत वाढ केली आहे. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत 77 रुपयांच्या स्तरापेक्षा जास्त आहे. एवढेच नव्हे तर उत्पादक कंपन्यांना कच्च्या मालाचा आणि सुट्या भागांचा तुटवडा भासत आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शाघांयच्या बंदरात अनेक जहाजांनी नांगर टाकला आहे. याठिकाणी जहाजांचा तांडा उभा आहे. हा माल निश्चित कालावधीत पोहचत नसल्याने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणा-यांना मोठा फटका बसू शकतो.

जानेवारी महिन्यात वाढले होते भाव

यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये भावात वाढ झाली होती. जर परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात किंमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गोदरेज होम अप्लाएंसेजचे व्यवसाय विभाग प्रमुख कमल नंदी यांनी 3 टक्के वाढ होणार हे निश्चित असल्याचे सांगत ती कधी होते हा प्रश्न असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें