e-filing portal: टॅक्स पोर्टल 15 सप्टेंबरपर्यंत व्यवस्थित सुरु कराच; मोदी सरकारची इन्फोसिसला डेडलाईन

Income Tax Portal | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सलील पारेख यांना समन्स बजावत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सलील पारेख हे सोमवारी निर्मला सीतारामन यांच्यासमोर हजरही झाले होते.

e-filing portal: टॅक्स पोर्टल 15 सप्टेंबरपर्यंत व्यवस्थित सुरु कराच; मोदी सरकारची इन्फोसिसला डेडलाईन
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 6:31 AM

नवी दिल्ली: आयकर विभागाच्या नव्या ऑनलाईन पोर्टलबाबत गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड सावळागोंधळ सुरु आहे. या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे करदात्यांना मनस्ताप होत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून इन्फोसिस कंपनीला डेडलाईन देण्यात आली आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत टॅक्स पोर्टलमधील सर्व तांत्रिक त्रुटी दूर झाल्या पाहिजे, असे अर्थखात्याकडून इन्फोसिसला सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता इन्फोसिस कंपनी काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सलील पारेख यांना समन्स बजावत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सलील पारेख हे सोमवारी निर्मला सीतारामन यांच्यासमोर हजरही झाले होते. यावेळी त्यांनी निर्मला सीतारामन यांच्यासमोर आपली बाजू मांडली. ई पोर्टलविषयी निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच 15 सप्टेंबरपर्यंत टॅक्स पोर्टलमधील सर्व बिघाड दुरुस्त करा. त्यानंतर कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही, असा इशारा सीतारामन यांच्याकडून देण्यात आला.

इन्फोसिसच्या CEO ना धाडलं समन्स, अवघ्या काही तासांत टॅक्स पोर्टल सुरु

गेल्या आठवड्यात टॅक्स पोर्टल पूर्णपणे बंद पडले होते. आयकर विभागाने शनिवारी ट्विट करुन तशी माहितीही दिली होती. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला होता. त्यांनी समन्स बजावत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सलील पारेख यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डोळे वटारल्यानंतर इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. त्यानंतर काही तासांमध्येच Income Tax Portal व्यवस्थितपणे कार्यरत झाले. मात्र, त्यामधील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या नव्हत्या.

नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 90 तांत्रिक अडचणी

केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या आयकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे करदाते प्रचंड हैराण झाले आहेत. यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 90 तांत्रिक त्रुटी असल्याची माहिती आतापर्यंत पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांची मध्यंतरी बैठकही झाली होती. यावेळी निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या. आयकर पोर्टल हे वापरण्याजोगे आणि सुलभ करावे. करदात्यांना हे पोर्टल वापरताना चांगला अनुभव मिळाला पाहिजे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

संबंधित बातम्या:

Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल, करदात्यांसाठी कोणती सुविधा?

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

Income Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.