कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळवा झटपट 1 लाख रुपये, जाणून घ्या EPF Advance कसा काढायचा?

EPF Advance | तुम्ही अर्ज केल्यानंतर एक ते दोन दिवसांत ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. ही रक्कम तुमच्या सॅलरी अकाऊंट किंवा संबंधित रुग्णालयाच्या खात्यात थेट जमा होईल.

कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळवा झटपट 1 लाख रुपये, जाणून घ्या EPF Advance कसा काढायचा?
ईपीएफ अॅडव्हान्स

नवी दिल्ली: नोकरदार व्यक्तींच्या पगारातील ठराविक रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत (PF) जमा होत असते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या उतारवयासाठीची पुंजी मानली जाते. सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO नोकरदारांना अडचणीच्या काळात वापरण्यासाठी पीएफची काही रक्कम आगाऊ काढण्याची सुविधा देऊ केली आहे. EPFO ने नुकताच यासंदर्भात आदेश जारी केला होता. त्यानुसार पीएफधारक कोणत्याही कागदपत्रांशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो.

आजारपणाच्यावेळी खर्चासाठी PF खात्यातील पैसे काढण्याची मुभा

आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता. या अर्जात आजार आणि रुग्णालयाची संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल. पीएफ खातेधारक स्वत:साठी आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी पैसे घेऊ शकतो. यापूर्वी रुग्णालयाचे बिल दाखवल्यानंतरच पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढता येत होती. मात्र, आता केवळ एक अर्ज दिल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. या सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रक्कम किती दिवसांत मिळणार?

तुम्ही अर्ज केल्यानंतर एक ते दोन दिवसांत ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. ही रक्कम तुमच्या सॅलरी अकाऊंट किंवा संबंधित रुग्णालयाच्या खात्यात थेट जमा होईल. त्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर 45 दिवसांच्या आतमध्ये कर्मचाऱ्याला बिल जमा करावे लागेल. तुम्ही काढलेला हा Advance तुम्हाला शेवटी मिळणाऱ्या रक्कमेतून कापला जाईल.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

* सर्वप्रथम www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर जावे.
* संकेतस्थळावर गेल्यानंतर क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) भरावा.
* याठिकाणी आपल्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी.
* प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम या पर्यायवर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर एक ड्रॉपडाऊन मेन्यू येईल. त्यामध्ये Advacne (Form 31) हा पर्याय निवडावा.
* Form 31 भरताना तुम्हाला पैसे काढण्याचे कारण नमूद करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला किती रक्कम हवी आहे, तेदेखील नमूद करावे. तसेच आपल्या बँकेच्या चेकची स्कॅन कॉपी आणि पत्ता फॉर्ममध्ये नमूद करावा.
* यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल.

संबंधित बातम्या:

PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट

आता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

गरज भासल्यास निवृत्ती निधीचा करु शकता वापर, या परिस्थितीत काढू शकता पीएफ खात्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI