EPFO कडून सहा कोटी खातेधारकांना महत्त्वाचा इशारा; या गोष्टीचं पालन करा, अन्यथा…

EPFO | कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्थात पीएफ सर्वात महत्वाची आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.

EPFO कडून सहा कोटी खातेधारकांना महत्त्वाचा इशारा; या गोष्टीचं पालन करा, अन्यथा…
ईपीएफओ
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 11:41 AM

नवी दिल्ली: जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निधीने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ‘ईपीएफओ’ने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्थात पीएफ सर्वात महत्वाची आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्यावर व्याजदेखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफच्या पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.

EPFO ने ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

ईपीएफओने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे, ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही.

खोट्या संकेतस्थळांचा वापर करु नका

याशिवाय, भविष्य निर्वाह निधीसंबंधी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपण अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करत आहोत किंवा नाही, याची खात्री करावी. अन्य़था हॅकर्स तुमच्या पीएफ खात्याचा अ‍ॅक्सेस मिळवून त्यामधील पैसे लंपास करु शकतात.

दिवाळीपूर्वी केंद्र सरकार 6 कोटी नोकरदारांच्या खात्यात जमा करणार पैसे

गेल्या बऱ्याच दिवसांपासून नोकरदारांच्या पीएफ खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे समजते. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) दिवाळीपूर्वी नोकरदारांच्या खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा करेल, असा अंदाज आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी EPFO केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी पीएफवरील वाढीव व्याजदर आणि महागाई भत्ता (DA) असा दुहेरी फायदा मिळेल. त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्रालय हे पैसे नोकदरात आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्यासाठी हिरवा कंदील कधी दाखवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या सात वर्षातील सर्वाधिक कमी व्याजदर

गेल्यावर्षी देशात कोरोनाची साथ आल्यानंतर EPFO कडून पीएफ खात्यावरील व्याजदर 8.5 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला होता. हा गेल्या सात वर्षातील सर्वाधिक कमी व्याजदर ठरला होता. यापूर्वी 208-19 या आर्थिक वर्षात पीएफ खात्याचा व्याजदर 8.65 टक्के इतका होता. तर 2017-18 मध्ये हा व्याजदर 8.55 टक्के इतका होता.

संबंधित बातम्या:

पीएफ खातेधारकांना घरबसल्या भरता येणार ई नॉमिनेशन; जाणून घ्या काय फायदा होणार?

PF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?

PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.