Personal Loan Benefits | कोणत्या परिस्थितीत वैयक्तिक कर्ज ठरेल सर्वोत्तम पर्याय? येथे घ्या जाणून!

Personal Loan Benefits | जर तुम्ही यापूर्वीच्या कर्जाची परतफेड वेळेत केली असेल आणि क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज अगदी सहज मिळू शकते.

Personal Loan Benefits | कोणत्या परिस्थितीत वैयक्तिक कर्ज ठरेल सर्वोत्तम पर्याय? येथे घ्या जाणून!
वैयक्तिक कर्ज किती गरजेचेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 6:37 PM

Personal Loan Benefits | वैयक्तिक कर्ज (Personal Loan) अगदी सहज उपलब्ध होते. फारशी कागदपत्रांची (Documents) गरज नसते. आता तर इन्सटंट लोनचा ही प्रकार आला आहे. अनेक वित्तीय संस्था, बँका ऑनलाईन, मोबाईल अॅपच्या माध्यमातून काही मिनिटात कर्ज मंजूर करुन तुमच्या खात्यात रक्कम जमा ही करतात. वैयक्तिक कर्ज मिळवणे जेवढे सोपे आहे. तेवढेच ते असुरक्षित ही मानण्यात येते. जर तुम्ही यापूर्वीच्या कर्जाची परतफेड वेळेत केली असेल आणि क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज अगदी सहज मिळू शकते. मुलांचे शिक्षण असो वा वैद्यकीय संकट, कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला कारण न विचारता ते सहज उपलब्ध होते. त्यामुळे तुमची त्यावेळची निकड पूर्ण होते आणि नंतर तुम्हाला त्याची परतफेड करता येते. हप्ता न चुकवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो आणि पुढे कर्ज घेताना त्याचा फायदा ही होतो. कोणत्या परिस्थितीत वैयक्तिक कर्ज योग्य ठरते, ते पाहुयात.

लग्नासाठी आर्थिक मदत

लग्नात किती रक्कम लागेल, अचानक कोणता खर्च येईल हे सांगता येत नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्याचे लग्न होत असेल आणि लग्नाच्या खर्चासाठी पैसे कमी पडत असतील, तर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊन ही गरज सहज पूर्ण करू शकता. पण पर्सनल लोनमध्ये व्याज जास्त आहे, त्यामुळे फक्त तेवढेच कर्जड घ्या ज्याचा EMI तुम्ही नंतर सहज भरू शकता. गरज नसताना जास्तीचे कर्ज घेऊ नका. नाहीतर गरजा भागावताना वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचे दडपण कायम राहते.

क्रे़डिट कार्डची थकबाकी

क्रेडिट कार्डद्वारे अचानक खर्च वाढतो. खर्च करताना क्रेडिट कार्ड असले की तो वेळीच लक्षात येत नाही. अशावेळी वेळेत रक्कम जमा केली नाही तर, तुम्हाला 40 टक्के वार्षिक व्याज द्यावे लागते. इतके जास्त व्याज देण्यापेक्षा वैयक्तिक कर्ज घेऊन क्रेडिट कार्डची थकबाकी भरणे केव्हाही चांगले ठरते. यामुळे भरघोस व्याजदरापासून तुमचे संरक्षण होईल.

हे सुद्धा वाचा

चांगल्या परताव्यासाठी

अनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घेणे योग्य नाही, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे एकतर नाहक खर्च तर होतोच, पण कर्जाचे हप्ते फेडतानाही दमछाक होते. तसेच अनावश्यक वस्तू घरात येऊन पडते ते वेगळेच. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी, व्यक्तीने दोनपेक्षा जास्त वेळा वैयक्तिक कर्ज घेऊ नये. पण जर तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी गुंतवणूक केल्याने तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळू शकेल, पण तुमच्याकडे वेळीच गुंतवणुकीसाठी रक्कम नसेल तर अशावेळी वैयक्तिक कर्ज घेता येईल. पण हे करताना वित्तीय सल्लागाराचा सल्ला मात्र आवश्य घ्या. नाहीतर तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले अशी आवस्था ही होऊ शकते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.