फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताय, सप्टेंबर महिन्यात जास्त रिटर्न्स मिळवण्याची संधी, जाणून घ्या कारण

Fixed Deposit | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त गेल्या महिन्यात मर्यादित कालावधीची विशेष ठेव योजना सुरू केली होती.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताय, सप्टेंबर महिन्यात जास्त रिटर्न्स मिळवण्याची संधी, जाणून घ्या कारण
फिक्स्ड डिपॉझिट
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 7:48 AM

नवी दिल्ली: जर तुम्हाला मुदत ठेव अर्थात FD द्वारे पैसे गुंतवायचे असतील तर सध्याचा कालावधी अगदी योग्य आहे. कारण, स्टेट बँके ऑफ इंडियाच्या विशेष फिक्स्ड डिपॉझिट स्कीमची मुदत ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढवण्यात आली आहे.त्यामुळे आता इच्छुक गुंतवणूकदार या योजनेत 30 सप्टेंबरपर्यंत पैसे गुंतवू शकतात. परंतु या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळेल ज्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने पैसे गुंतवायचे आहेत. तसेच यासाठी किमान 5 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त गेल्या महिन्यात मर्यादित कालावधीची विशेष ठेव योजना सुरू केली होती. या विशेष ठेव योजनेचे नाव एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेल्या योजनेची मुदत मंगळवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2021 रोजी संपली होती. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत बँकेचे ग्राहक मुदत ठेवींवर 15 बेसिस पॉइंट (बीपीएस) अधिक व्याज मिळवू शकता. अशा परिस्थितीत जर तुम्हाला एफडी मिळवायची असेल किंवा कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 75 दिवस

सध्याचा दर- 3.90 टक्के प्रस्तावित दर- 3.95 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 525 दिवस

सध्याचा दर- 5 टक्के प्रस्तावित दर- 5.10 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 2250 दिवस

सध्याचा दर- 5.40 टक्के प्रस्तावित दर- 5.55 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 75 दिवस

सध्याचा दर- 4.40 टक्के प्रस्तावित दर- 4.45 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 525दिवस

सध्याचा दर- 5.50 टक्के प्रस्तावित दर- 5.60 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 2250 दिवस

या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 6.20 टक्के इतका व्याजदर दिला जात आहे.

डेबिट कार्डवरून जास्त पैसे खर्च केले, मग रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करा

नेकदा शॉपिंगला गेल्यावर वस्तू खरेदी करण्याच्या नादात आपल्याला नेमक्या खर्चाचा अंदाज येत नाही. पण बिलिंग काऊंटरवर गेल्यानंतर आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला असे लक्षात येते. तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर पैसे तात्काळ भरावे लागतात. परंतु, त्यामुळे पुढील खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची भीती असते.

अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डेबिट कार्डधारकांना खास सोय देऊ केली आहे. त्यानुसार ग्राहक डेबिट कार्डवरून पूर्ण पैसे खर्च न करता ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करु शकता. ग्राहकपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्ही ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी करतानाही तुम्हाला या विशेष सुविधेचा लाभ घेता येईल.

योजनेचा फायदा काय?

स्टेट बँकेच्या डेबिट कार्डवर केलेल्या खर्चाची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट केल्यास तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. तसेच यासाठी कोणतीही कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. शॉपिंगची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर तुमच्या बचत खात्यामधील लिमीट पूर्ववत होईल.

इतर बातम्या:

महागडा मोबाईल, त्याचा विमा, नंतर क्लेम, पोलिसात तक्रारीचा कट आणि महिला अडचणीत

भारतात कोणती कंपनी मोबाईल इंटरनेटमध्ये अव्वल? ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान लाँच, 100 जीबीचा हायस्पीड डेटा मिळणार

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.