AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: सोन्याच्या दरात चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 9300 रुपयांनी स्वस्त

Gold price | फेड टेम्परिंग टाईमलाईनविषयी असलेली अनिश्चितता आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत असल्याने भारतामध्ये सध्या सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दरात चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 9300 रुपयांनी स्वस्त
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 10:19 AM
Share

मुंबई: गेल्यावर्षी सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घालणाऱ्या सोन्याचा दरात सध्या घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा सोन्याची किंमतीत घट नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.1 टक्क्यांनी म्हणजे साधारण 48 रुपयांनी घसरला. तर डिसेंबर वायदाच्या चांदीचा दर 0.24 टक्के म्हणजे साधारण 149 रुपयांनी घसरला. त्यामुळे मंगळवारी सोन्याचा प्रतितोळा दर 46,860 रुपये या पातळीवर आहे. तर चांदीचा प्रतिकिलो दर 63,196 रुपये इतका नोंदवण्यात आला. गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने 9340 रुपयांनी स्वस्त आहे.

फेड टेम्परिंग टाईमलाईनविषयी असलेली अनिश्चितता आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत असल्याने भारतामध्ये सध्या सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

सोन्याचा भाव एक महिन्यातील निचांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला होता.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम वॉलेटकडून (PayTm) ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही ‘गुगल पे’वरुन या सोन्याची विक्रीही करू शकता.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, रेकॉर्ड स्तरापेक्षा 8,200 रुपयांनी स्वस्त

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.