Gold Silver Rate | सोन्यात पुन्हा घसरण तर चांदीचा भावही कमी..सोन्यात गुंतवणुकीची संधी..

Gold Silver Rate | सोन्याचे दर चार महिन्यांच्या निच्चांकीस्तरावर पोहचले आहे. कमोडिटी बाजारापासून सराफा पेठ्यात सोन्याची लकाकी उतरली आहे..

Gold Silver Rate | सोन्यात पुन्हा घसरण तर चांदीचा भावही कमी..सोन्यात गुंतवणुकीची संधी..
सोने-चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 4:37 PM

नवी दिल्ली : सोने आणि चांदीचा दर (Gold Silver Rate) पुन्हा गडगडले. गेल्या आठवडाभरापासून भावात घसरण सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारापासून (International Market) तर देशातंर्गत सराफा पेढ्यात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. सोन्यासोबत चांदीची चमकही फिक्की पडली आहे.

अमेरिका आणि युरोपियन देशात मंदीच्या आशंकेने या महागड्या धातुच्या किंमतीत कमालीचा फरक दिसून येत आहे. अमेरिकेची केद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदर वाढवण्याची दाट शक्यता आहे. व्याजदरात 100 बेसिस पॉइंट म्हणजे 1 टक्का वाढ होण्याची शक्यता आहे.

या सर्वांचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींवर झाला आहे. सोन्या-चांदीच्या किंमती चार महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचल्या. त्यामुळे सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सुवर्ण काळ समजण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

MCX वर गोल्ड फ्यूचरमध्ये 1.3 टक्के म्हणजे 600 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 46,029 रुपयांवर पोहचला. चांदीतही घट आली. चांदी 1.6 टक्क्यांनी घसरली. चांदी प्रति किलो 63,983 रुपयांवर पोहचली.

गेल्या व्यापारी सत्रात सोने आणि चांदीच्या किंमतीत 1,000 ते 2,000 रुपयांची घसरण दिसून आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात ही सोन्याचा दरात 4.4 टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकेत नोकऱ्या सोडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच महागाईचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे येत्या काही काळात सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

चांदीच्या भावात 7.5 टक्क्यांची घसरण आली आहे. हा दर गेल्या आठ महिन्यांतील सर्वात निच्चांकी स्तर आहे. चांदीत गेल्या वेळी 1.9 टक्क्यांची घसरण झाली.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.