Salary hike : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; चालू वर्षात ‘एवढा’ वाढणार पगार, जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात किती वेतनवाढीची शक्यता

Salary hike : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; चालू वर्षात 'एवढा' वाढणार पगार, जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात किती वेतनवाढीची शक्यता

पगारवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा जवळपास सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगार वाढण्याचा अंदाज टीमलीजच्या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

अजय देशपांडे

|

May 13, 2022 | 12:07 PM

मुंबई : पगार (Salary) वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चालू वर्षात जवळपास सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची (Salary Increment) शक्यता आहे. टीमलीजच्या जॉब्स अँण्ड सॅलरी प्राईम रिपोर्ट 2021-22 अनुसार गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकतात. या वर्षी जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल, मात्र ही पगारवाढ मर्यादीत असेल. या वर्षी सॅलरीमध्ये 8.13 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे देखील या अहवालामध्ये (Report) म्हटले आहे. विविध 17 व्यवसायिक क्षेत्रांचा अभ्यास करून हा अहवाल बनवण्यात आला आहे. हा अहवाल देशातील महत्त्वाच्या 9 शहरातील कर्मचाऱ्यांच्या पगारावर आधारीत आहे. या अहवालानुसार अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या शहरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

अहवालात नेमकं काय म्हटले?

चालू वर्षात कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार यावर आधारीत हा अहवाल आहे. देशातील नऊ शहरे आणि 17 क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा अभ्यास करून हा अहवाल बनवण्यात आला आहे. या अहवालानुसार चालू वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 8.13 टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज आहे. यंदा प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल, मात्र ही पगारवाढ मर्यादीत असेल असे देखील या अहवालात म्हटले आहे.अहवालानुसार अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या शहरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे पगारवाढ रखडली होती. मात्र यंदा या रिपोर्टमुळे कर्मचाऱ्यांना थोडातरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या क्षेत्रात दहा टक्क्यांपेक्षा कमी पगारवाढ

टीमलीजच्या अहवालानुसार कृषी, रसायनिक खते, ऑटोमोबाईल आणि त्याच्याशी संबंधित इतर क्षेत्र, बँक, वित्तसंस्था, बीपीओ सेक्टर, आयटी, बांधकाम क्षेत्र, शिक्षण आणि शिक्षणाशी संबंधित इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल, मात्र ती दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल असे म्हटले आहे. देशात गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट होते. कोरोना काळात पगारवाढ थांबवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे संकट टळले असून, पगारवाढीचा मार्ग मोकाळा झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें