पासपोर्ट कसा बनवावा? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती
भारत सरकारने पासपोर्ट प्रक्रियेला आता पूर्णपणे ऑनलाइन स्वरूप दिले असून, घरबसल्या या प्रक्रियेत सहभागी होता येते. जर तुम्ही पहिल्यांदाच पासपोर्टसाठी अर्ज करत असाल, तर हे स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन आवश्य उपयुक्त ठरेल.

आजच्या युगात परदेशी प्रवास, शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीसाठी पासपोर्ट हा अत्यावश्यक दस्तऐवज ठरला आहे. पूर्वीपासून तुलना करता आता भारत सरकारने पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे आता घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज करता येतो. तरीही पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटू शकते. म्हणूनच येथे आम्ही तुम्हाला पासपोर्ट मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती देत आहोत.
1. ऑनलाइन नोंदणी करा :
सर्वप्रथम तुम्हाला www.passportindia.gov.in या अधिकृत पासपोर्ट सेवा पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. यामध्ये नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाइल नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती भरून यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागतो.
2. अर्ज भरणे:
नोंदणी झाल्यावर लॉग इन करून नवीन पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. या फॉर्ममध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, स्थायी पत्ता, सध्याचा पत्ता, शिक्षणाची माहिती, पालकांची माहिती यांसारखे तपशील विचारले जातात.
3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
अर्ज भरल्यानंतर आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. या कागदपत्रांद्वारे तुमची ओळख, पत्ता व जन्मतारीख सिद्ध होते.
4. अपॉइंटमेंट बुक करा आणि फी भरा:
कागदपत्र अपलोड केल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रासाठी वेळ (appointment) बुक करावी लागते. त्यानंतर अर्ज फी भरावी लागते. ही फी ऑनलाइन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येते.
5. पासपोर्ट सेवा केंद्रावर प्रत्यक्ष हजेरी:
निश्चित केलेल्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रांसह जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रावर उपस्थित राहा. येथे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी, फोटोग्राफिंग व बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅन) प्रक्रिया केली जाते.
6. पोलिस व्हेरिफिकेशन:
पारदर्शकतेसाठी अर्जदाराच्या पत्त्यावर स्थानिक पोलिस व्हेरिफिकेशनसाठी येतात. यामध्ये तुमचं वास्तव्यातील ठिकाण, शैक्षणिक व सामाजिक माहिती विचारली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पासपोर्ट प्रक्रिया पुढे सरकते.
7. पासपोर्ट मिळवणे:
पोलिस व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत तुमचा पासपोर्ट पोस्टाने तुमच्या पत्त्यावर पाठवला जातो. त्याचा ट्रॅकिंग क्रमांकही दिला जातो, ज्यामुळे तुम्ही त्याची स्थिती ऑनलाइन पाहू शकता.
पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी:
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र (ओळखीचा पुरावा)
वीज बिल, बँक स्टेटमेंट, गॅस बुक, राशन कार्ड (पत्त्याचा पुरावा)
जन्म प्रमाणपत्र (जर तुमचं वय १८ वर्षांखालील असेल)
२ पासपोर्ट साइज फोटो
शेवटी: जर तुम्ही परदेशी प्रवास, नोकरी किंवा शिक्षणासाठी योजना आखत असाल, तर पासपोर्ट ही पहिली पायरी आहे. वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज आणि त्रासमुक्तपणे तुमचं पासपोर्ट मिळवू शकता. हे लक्षात ठेवा की सर्व माहिती आणि कागदपत्र अचूक असणे आवश्यक आहे, त्यामुळे कोणताही घोळ टाळण्यासाठी आधीच तयारी करा.
