नवी दिल्ली: नोकरदारांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्य निर्वाह निधी अर्थात PF खात्यासंदर्भातील काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जेणेकरून भविष्यात पीएफ खात्यामधील पैसे तातडीने काढायचे झाल्यास ते ऑनलाईन पद्धतीने तात्काळ काढता येतील. अनेकदा तुमचे बँक खाते ईपीएफओशी जोडलेले नसते. त्यामुळे पीएफचे पैसे काढायचे झाल्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे तुमचे बँक खाते EPFO अकाऊंटशी जोडणे चांगला पर्याय ठरतो.
* सर्वप्रथम unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ पोर्टलवर लॉग इन करावे. * युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे. * मॅनेज हा पर्याय निवडावा. * ड्रॉप-डाऊनमध्ये केवायसी या पर्यायाची निवड करावी. * डॉक्युमेंट पर्याय निवडून त्यामध्ये बँकेचा तपशील भरावा. * बँक खात्याचा क्रमांक आणि IFSC कोड नमूद करावा. * ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत सेव्ह बटणावर क्लिक करावे.
> प्रथम unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा >> लॉगिन करण्यासाठी यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. >> एक नवीन पेज दिसेल, सर्वात वर ‘मॅनेज’ वर क्लिक करा. >> आता मार्क एक्झिटवर क्लिक करा. >> तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट एम्प्लॉयमेंट दिसेल, तुमच्या UAN शी लिंक असलेला जुना PF खाते क्रमांक निवडा. >> त्या खात्याशी आणि नोकरीशी संबंधित तपशील येथे दिसेल. >> आता, नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण प्रविष्ट करा. करी सोडण्याचे कारण म्हणजे सेवानिवृत्ती, अल्प सेवा. >> ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. आता, ओटीपी प्रविष्ट करा आणि चेक बॉक्सवर क्लिक करा. >> अपडेटवर क्लिक करा, नंतर ओके आणि तुमचे काम झाले.
संबंधित बातम्या:
भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तुर्भेत उभारले
इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार