ITR Filing: पटापट कामं आटोपून घ्या; ‘या’ दिवशी आयकर पोर्टल 12 तास राहणार बंद

Income Tax portal | www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते.

ITR Filing: पटापट कामं आटोपून घ्या; 'या' दिवशी आयकर पोर्टल 12 तास राहणार बंद
आयकर
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 12:53 PM

नवी दिल्ली: तुम्ही आयकर परतावा भरण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाची नवीन वेबसाइट शनिवारी (23 ऑक्टोबर) आणि रविवारी (24 ऑक्टोबर) बंद राहणार आहे. तांत्रिक देखभालीसाठी हा तात्पुरता ब्रेक घेण्यात येणारआहे. त्यामुळे आज रात्री 10 ते उद्या सकाळी 10 पर्यंत आयकर पोर्टलचे कामकाज बंद असेल. मात्र, या काळात तुम्ही पोर्टलवर ITR फाइल करु शकता. स्वतःची कायदेशीर वारस म्हणून नोंदणी करू शकता, इन्कम टॅक्स रिटर्नच्या पडताळणीसाठी तुमची डिजिटल स्वाक्षरी नोंदवू शकता.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा सुरु नव्हत्या. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात होता.

इन्फोसिस कंपनीला देण्यात आले होते प्रोजेक्ट

मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.  पोर्टल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2019 ते जून 2021 या काळात इन्फोसिस कंपनीला 164.5 कोटी रुपये अदा केले होते.

नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 90 तांत्रिक अडचणी

केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या आयकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे करदाते प्रचंड हैराण झाले होते. यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 90 तांत्रिक त्रुटी असल्याची माहिती पुढे आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांची बैठकही झाली होती. यावेळी निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या. आयकर पोर्टल हे वापरण्याजोगे आणि सुलभ करावे. करदात्यांना हे पोर्टल वापरताना चांगला अनुभव मिळाला पाहिजे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

Income Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…

New e-filing portal: नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 40 तांत्रिक अडचणी

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.