पीपीएफ खाते करेल मालामाल; 5 एप्रिलपूर्वी खात्यावर टाका रक्कमेचा भार, चक्रवाढ व्याजाने मिळेल परतावा

जर तुम्ही दरवर्षी 5 एप्रिलपूर्वी पीपीएफ खात्यात पैसे जमा केले तर तुम्हाला अधिक व्याज मिळवण्याची आयती संधी चालून आली आहे. महिन्याच्या शेवटी जमा झालेल्या किमान रकमेच्या आधारे व्याज मोजले जाते, असा नियम आहे. यानुसार आधीच खात्यात पैसे जमा केले तर सहाजिकच व्याजही जास्त मिळेल.

पीपीएफ खाते करेल मालामाल; 5 एप्रिलपूर्वी खात्यावर टाका रक्कमेचा भार, चक्रवाढ व्याजाने मिळेल परतावा
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 8:57 AM

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीचा सर्वात फायदेशीर मार्ग मानला जातो. कर बचतीसह हमखास परतावा (PPF Returns) मिळत असल्याने अनेक गुंतवणुकदार या योजनेला सर्वाधिक पसंती देतात. विशेष म्हणजे या योजनेत फसवणुकीची कोणतीची भीती नाही, उलट बचत आणि चक्रवाढ व्याजाने कमाईची संधी मिळते. विशेष म्हणजे सरकार या योजनेची हमी घेते, त्यामुळे फसवणुकीचा धोका राहत नाही. विहित रक्कम योग्य वेळी गुंतवली तर ठेवीदाराला भविष्यात चांगली रक्कम मिळते.पीपीएफच्या नियमानुसार एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये पीपीएफ खात्यात जमा करता येतात. अशी रक्कम एका महिन्यात किंवा वार्षिक स्वरूपात जमा करण्याचा नियम आहे. पण जेव्हा कर सवलत मिळते किंवा करबचत (Tax Exemption) होते, तेव्हा खात्यात पैसे कधी जमा करायचे, हे फार महत्त्वाचे असते. प्रत्येक आर्थिक वर्षातील तारीख लक्षात घेऊन पीपीएफ खात्यात रक्कम जमा केल्यास अतिरिक्त फायदा होतो. तर मग आयडीयाची कल्पना तर तुम्हाला दिली आता फक्त डोकं खाजवत बसू नका, संधीचा फायदा घ्या.

पगारदार वर्ग आर्थिक वर्षाच्या शेवटी त्यांच्या पीपीएफ खात्यात पैसे जमा करतात. त्यामुळे त्यांच्या दोन गोष्टी साध्य होतात, एक तर बचत होते, त्यावर भरघोस व्याज मिळते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर सवलतीसाठी त्यांना हक्क सांगता येतो. पण तज्ज्ञांचा मते सुक्ष्म अर्थ नियोजन केल्यास गडबडीत केलेली गुंतवणूक फारशी फायद्याची ठरत नाही, फारतर ती वेळ मारुन नेण्यापूर्ती लाभाची ठरते. वेळीच पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर त्याचा मोठा फायदा होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा फायदा पीपीएफ खात्यात जास्त परताव्याच्या स्वरूपात होतो. प्रत्येक आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीत पैसे जमा झाले तर त्याचा परतावा सर्वाधिक असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही पुढच्या महिन्यात किंवा त्यानंतर पैसे जमा करता तेव्हा एक खूणगाठ मनाशी पक्की बांधा की, तुम्हाला 1 ते 4 या तारखेतच रक्कम जमा करायची आहे. त्यानंतर नाही. यामुळे ठेवींवर अधिक परतावा मिळतो.

अधिक परताव्याची कारणे

जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजानुसार पीपीएफमध्ये पैसे जोडले जातात. म्हणजेच पैशावरील व्याजावर ही व्याज मिळते. पीपीएफमध्ये जमा केलेले पैसे दरवर्षी चक्रवाढ व्याजाने वाढतात. हे व्याजाचे पैसे आर्थिक वर्षाच्या शेवटी पीपीएफ खात्यात जमा होतात. 5 तारखेपूर्वी पीपीएफ खात्यात पैसे जमा केले तर संपूर्ण महिन्याचे व्याज जोडले जाते.

पीपीएफवरील व्याजाची गणना

पीपीएफमध्ये जमा झालेल्या पैशांवरील व्याज योजनेच्या नियमांनुसार महिन्याच्या 5 व्या आणि शेवटच्या दिवसादरम्यानच्या किमान शिल्लकीवर मोजले जाते. तर हे व्याज दरमहा मिळत असले तरी आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते. त्यामुळे वार्षिक आधारावर पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफ्यासाठी 5 एप्रिलपूर्वी अशी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. मासिक ठेवींच्या बाबतीत विचार करता, ही रक्कम महिन्याच्या सुरुवातीलाच 5 तारखेपूर्वीच जमा करता आली पाहिजे.

संबंधित बातम्या

नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार

Petrol, Diesel Price: इंधन दरवाढ सुरूच; आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, …तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.