Alert : सर सलामत तो पगडी पचास, जरा सांभाळून, नोकरीचा हा मेल वाचून हुरळून जाऊ नका..

Alert : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये 100 तरुणांना ओलीस ठेवण्यात आले आहे..आता पुन्हा तशाच प्रकारची ट्रिक वापरण्यात येत आहे..

Alert : सर सलामत तो पगडी पचास, जरा सांभाळून, नोकरीचा हा मेल वाचून हुरळून जाऊ नका..
या धोक्यापासून रहा सावधImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 3:12 PM

नवी दिल्ली : नोकरीच्या (Jobs) आमिषाने म्यानमारमध्ये 100 तरुणांना ओलीस (hostage) ठेवण्यात आले आहे. त्यातील 32 जणांची सूटका करण्यात आली आहे. IT Company मध्ये नोकरीच्या आमिषाने या विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले. आता पुन्हा तशाच प्रकारची ट्रिक वापरण्यात येत आहे. तेव्हा सावध रहा..

केंद्र सरकारने शनिवारी IT Skilled असलेल्या तरुणांसाठी सूचना जारी केली आहे. त्यानुसार, जॉब रॅकेट चालविणारे पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरी देण्याचे आमिष दाखविले आहे. या आमिषाला तुम्ही बळी पडला तर तुमची सूटका अशीच कोणत्या तरी देशातील जंगलातून करावी लागेल..

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याविषयीचा इशारा दिला आहे. त्यानुसार, थायलंड आणि अन्य पूर्वेतील देशांमध्ये विविध पदांसाठी गलेलठ्ठ पगारावर नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात येत आहे. फर्जी कॉल सेंटरवरुन कॉल करण्यात येतो. एसएमएस, ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात येतो  त्यानंतर नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येते. ऑनलाईन अथवा एखाद्या शहरात ऑफलाईन मुलाखतीची प्रक्रिया राबविण्यात येते.

हे सुद्धा वाचा

डेटा एंट्री, मार्केटिंग, आयटी तसेच इतर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीचे आमिष दाखवण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवण्यात येते. त्यासाठी व्हिसा आणि इतर गोष्टींचा खर्चही करण्याचा दावा करण्यात येतो.

पण प्रत्यक्षात व्हिसा किंवा इतर कोणतीही प्रक्रिया पार पाडण्यात येत नाही. आंतरराष्ट्रीय सीमा उल्लंघन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. त्यांना म्यानमार मधून इतर देशात जाण्यास सांगण्यात येते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे रॅकेट सक्रीय आहे. त्यामुळे तरुणांनी या रॅकेटपासून सावध राहण्याचे आवाहन भारत सरकारने केले आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.