NPS Account: जेवढा पगार, तेवढी पेन्शन मिळणार, फक्त करा हे काम

About NPS: जानेवारी 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यात आली. यापूर्वी या योजनेत फक्त सरकारी कर्मचारी गुंतवणूक करु शकत होते.. पण 2009 मध्ये सर्व कर्मचा-यांना उतारवयासाठी गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला देण्यात आला.

NPS Account: जेवढा पगार, तेवढी पेन्शन मिळणार, फक्त करा हे काम
pension
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 8:50 AM

मुंबई : आयुष्याची संध्याकाळ सुखात आणि सुखद जावी यासाठी कमवत्या वयातच योग्य गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. कमावित्या वयात तुम्हाला जेवढा पगार (Salary)मिळतो. तेवढीच रक्कम निवृत्तीनंतर (Retirement) तुमच्या हातात आली तर. तर उतारवयात तुम्हाला औषधी-उपचार आणि इतर खर्चासाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. सरकारी कर्मचारीच नाही तर खासगी संस्थेत काम करणा-या कर्मचा-यांनाही या निवृत्ती योजनेचा फायदा उचलता येईल. सरकारी आणि खासगी सदस्यांना गुंतवणूक करताना नियम एक सारखे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना जोखमीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तर खासगी क्षेत्रातील सदस्यांना एकूण रक्कमेच्या 75 टक्के गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. तर म्हतारपणातही पैसा हाती असल्याने तुम्ही चिंतामुक्त जगू शकाल. पण हे कसं शक्य आहे? यासाठी तुम्हाला फक्त NPSमध्ये खातं उघडणं गरजेचं आहे. आता तुमचा प्रश्न असा असेल की हा NPS आहे का आणि त्यात खाते उघडल्यास पगाराएवढी पेन्शन कशी मिळणार? NPSशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत देण्याचा हा प्रयत्न

एनपीएस म्हणजे काय?

नेशन पेन्शन सिस्टिम (NPS) ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळावे आणि उतारवयात खर्चासाठी काम करावे लागू नये ही बाब लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही सरकारद्वारे चालविली जाणारी अंशदायी पेन्शन योजना आहे. ‘ NPS ‘ मध्ये पैसे जमा केल्यानंतर निवृत्तीवर मोठा निधी एकरकमी (Retirement fund) मिळतो. तसेच तुमच्या वार्षिकीची रक्कम आणि त्याची कामगिरी यांच्या आधारे तुम्हाला मासिक पेन्शन (Monthly Pension) मिळते.

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जानेवारी 2004 मध्ये सुरू करण्यात आली. यापूर्वी या योजनेत फक्त सरकारी कर्मचारी (Government Employees) गुंतवणूक करु शकत होेत. पण 2009 मध्ये सर्व कर्मचा-यांना उतारवयासाठी गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला देण्यात आला.

एनपीएसमध्ये खाते कोण उघडू शकेल?

तुम्ही एनपीएस खाते तुमच्या नावावर किंवा तुमच्या पत्नीच्या नावानेही उघडू शकता. या योजनेत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक वेळची रोख रक्कम आणि मासिक पेन्शनची सुविधा दिली जाते. 18 ते 70 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकतो. राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीतील (National Pension System) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने खास दिलासा दिला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या 14 टक्के योगदानावर करकपातीचा लाभ मिळणार आहे. एनपीएस योगदानात राज्य आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना कर सवलतींमध्ये आतापर्यंत असमानता होती. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. या अर्थसंकल्पात ही नाराजी दूर करण्यात आली आहे.

एनपीएसमधील ग्राहकांची संख्या वाढली

नियोक्त्याच्या योगदानावर जी कर वजावट मिळते ती 80 सीच्या सवलतीव्यतिरिक्त मिळते. एनपीएस पेन्शन योजनेतील ग्राहकांची संख्या 4.63 कोटी इतकी असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 24 टक्क्यांनी अधिक असल्याचे आर्थिक पाहणीत आढळून आले आहे.

नियम एकसारखे नाहीत

सरकारी आणि खासगी सदस्यांना गुंतवणूक करताना नियम एक सारखे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना जोखमीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तर खासगी क्षेत्रातील सदस्यांना एकूण रक्कमेच्या 75 टक्के गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे.

संबंधीत बातम्या

Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत

Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण

Big News: देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न! रेल्वे डब्यांवर तुफान दगडफेक झाल्यानं खळबळ

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.