Income Tax | आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भरा इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

भारतीय डाक विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी ही नवीन सेवा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरची (CSC) मदत घ्यावी लागेल.

Income Tax | आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भरा इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Post Office Time Deposit Account

मुंबई : करदात्यांसाठी चांगली बातमी आहे. आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. भारतीय डाक विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी ही नवीन सेवा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरची (CSC) मदत घ्यावी लागेल. इंडिया पोस्टने या सेवेबद्दल यापूर्वीच घोषणा केली होती. त्यामुळे येत्या काही दिवसात टपाल कार्यालयात ही सेवा सुरू झाल्यावर देशातील लाखो करदाता इनकम टॅक्स रिटर्न ITR दाखल करु शकतील.

आतापर्यंत हे काम व्यावसायिक आयकर तज्ञ किंवा सीएमार्फत करावे लागते. तर काही लोक स्वत: ऑनलाईन ITR देखील दाखल करतात. पण त्यात कर संबंधित तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अनेकांना आयटीआय दाखल करणे हे इतर कामांपेक्षा कठीण वाटते. त्यामुळे करदात्यांना दिलासा देण्यासाठी इंडिया पोस्टने ही नवीन सेवा सुरू केली आहे.

टपाल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला आयकर विवरणपत्र भरण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही. आता इन्कम टॅक्स भरण्यासाठीची सेवा तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयातील CSC काऊंटरवर सहज मिळू शकते.

 CSC म्हणजे काय?

पोस्ट ऑफिसमध्ये चालणारे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) खूप उपयुक्त मानले जाते. या केंद्रावर बरीच मोठी कामे सहज केली जातात. या केंद्राची मदत घेण्यासाठी लोकांना त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागेल. पोस्ट ऑफिसची सीएससी सेवा देशभरात एकसारखी चालविली जाते. या केंद्राच्या माध्यमातून बरीच आर्थिक कामे सहजपणे निकाली काढता येतील. या ठिकाणी केलेली कामे मुख्यत: टपाल सेवा, बँकिंग आणि विमा सेवेशी संबंधित आहेत. याशिवाय अनेक सरकारी सुविधांचे फायदे आणि माहिती सीएससी काउंटरमधून घेता येऊ शकते. देशातील नागरिकांच्या सोयीसाठी भारत सरकार डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत बरीच ई-सेवा चालवते. या सेवा टपाल कार्यालयातून घेता येतील.

ITR कसा फाईल कराल:

  1. आयकर विभागाच्या पोर्टल https://www.incometaxindiaefiling.gov.in/ ला भेट द्या.
  2. यूजर आयडी (पॅन), संकेतशब्द, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून वेबसाइटवर लॉगीन करा. असे केल्यावर ‘ई-फाईल’ टॅबवर जा आणि प्राप्तिकर परतावा लिंकवर क्लिक करा.
  3. कोणता आयटीआर फॉर्म भरायचा आणि त्याचे मूल्यांकन वर्ष कोणते आहे हे आपण येथे ठरवावे.
  4. आपण मूळ रिटर्न भरत असल्यास नंतर ‘मूळ’ टॅबवर क्लिक करा. असे केल्यावर, प्रीपेअर आणि सबमिट ऑनलाईन पर्याय निवडा आणि नंतर सुरू ठेवा वर क्लिक करा.
  5. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर सत्यापन पृष्ठ उघडेल, जे आपण एकाच वेळी सत्यापित करू शकता, अन्यथा आपण 120 दिवसांत सत्यापित करू शकता. यानंतर, प्रीव्ह्यूवर क्लिक करा आणि आयटीआरवर सबमिट करा.
  6. या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुम्हाला हा संदेश आयटीआरवर आला असेल तर आपल्याला फॉर्म योग्यरित्या भरला आहे की नाही ते समजेल. हा संदेश प्राप्त न झाल्यास याचा अर्थ असा की, आपला आयटीआर फॉर्म योग्यरित्या भरलेला नाही. आपली इच्छा असल्यास आपण आयटीआर दाखल करण्याची स्थिती देखील तपासू शकता.

(Now file Income Tax Return (ITR) at your nearest post office)

संबंधित बातम्या : 

SBI चा कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा, 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम

विजय माल्ल्याचे शेअर्स विकून बँकांना 792 कोटी मिळाले, 58 टक्के नुकसानाची झाली भरपाई

देशातील सर्वात मोठ्या सिगारेट कंपनीच्या बॉसच्या पगारात 47 टक्के वाढ, आता दररोज एवढे लाख मिळणार

Published On - 2:18 pm, Sat, 17 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI