AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bumper Share : गुंतवणूकदारांची धडपड, रिलायन्सचं आहे पाठबळ, तुम्ही घेतला का हा शेअर!

Bumper Share : रिलायन्स इंडस्ट्रीजने ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीसोबत लवकरच इंधनाला पर्याय घेऊन येत आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. त्यांना असा फायदा होणार आहे.

Bumper Share : गुंतवणूकदारांची धडपड, रिलायन्सचं आहे पाठबळ, तुम्ही घेतला का हा शेअर!
तर व्हाल मालामाल
| Updated on: Feb 26, 2023 | 6:42 PM
Share

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) सध्या हिंदोळ्यावर आहे. अदानी समूहावर हिंडनबर्ग (Hindenburg Report) बॉम्ब पडल्याने बाजारातही भीतीचे वातावरण पसरले आहे. अदानी समूहाचे शेअर धडाधड खाली घसरले. या महिन्यात शेअर बाजारात धडामधूम झाले. अनेक गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. काहींनी नफा कमाविला. तर काहींना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. अदानी समूहाचे अनेक शेअर प्रचंड खाली आले आहेत. त्यातही काही शेअर मात्र त्यांचा सातत्यपूर्ण कामगिरी बजावत आहेत. अशाच शेअरच्या शोधात सध्या गुंतवणूकदार आहेत. भविष्यात पेट्रोल-डिझेलला पर्याय उपलब्ध झाले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसोबतच हायड्रोजनवर (Hydrogen Vehicles) चालणारी वाहनं बाजारात येऊ घातली आहेत. त्यातीलच एका शेअरवर गुंतवणूकदारांनी उड्या टाकल्या आहेत.

इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या (Olectra Greentech) शेअरने शुक्रवारी जबरदस्त उसळी घेतली. ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 20 टक्क्यांनी वधारला. हा शेअर सध्या 482.45 टक्क्यांवर व्यापार करत आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने रिलायन्ससोबत नवीन प्रकल्प आणला आहे. त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत (RIL) तांत्रिक भागीदारी केली आहे. याप्रकल्पातंर्गत हायड्रोजनवरील बस (Hydrogen Bus) बाजारात दाखल करण्यात येणार आहे.

ओलेक्ट्रा ग्रीनटेक लवकरच हायड्रोजन बस बाजारात आणणार आहे. त्याविषयीची घोषणा कंपनीने केली आहे. या घोषणेनंतर गुंतवणूकदारांच्या नजरा या करारावर खिळल्या आहे. गुंतवणूकदारांनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीत गुंतवणूक वाढवली आहे. नवीन गुंतवणूकदारांनी हा शेअर खरेदी केला आहे.

शुक्रवारी बीएसईवर या कंपनीचा शेअरचे ट्रेडिंग व्हॅल्यूम 6 पटीने वाढले. तर एनएसई आणि बीएसईवर दुपारी 1:30 वाजेपर्यंत 60 लाखांहून अधिक शेअरची खरेदी विक्री झाली. ओलेक्ट्रा ग्रीनटेक, मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटिडेची उपकंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक बस तयार करते. कंपनी, उर्जा निर्मिती आणि वितरण कंपन्यांना ही कंपनी सिलकॉन रबर आणि कंपोझिट इन्सुलेटर्स उत्पादित करते.

ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअरमध्ये गेल्यावर्षी जोरदार तेजी आली होती. गेल्या तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ग्रीनटेकचा शेअर 1021 टक्क्यांनी वधरला आहे. या कंपनीचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 42.35 रुपयांवर व्यापार करत होता. ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा शेअर 24 जानेवारी 2023 रोजी बीएसईवर या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ होऊन तो 482.45 रुपयांवर आला आहे. या कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 739.40 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील नीच्चांकी किंमत 374.35 रुपये आहे.

विशेष सूचना : हा गुंतवणूकीचा कोणताही सल्ला नाही. गुंतवणुकीपूर्वी बाजाराचा अभ्यास, तज्ज्ञ आणि विश्लेषकांचा सल्ला जरुर घ्या.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.