AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card Photo : आधार कार्डवरील फोटो नाही आवडला, झटक्यात असा बदल

Aadhaar Card Photo : आधार कार्डवरील फोटो बदलणे फार अवघड नाही, यापूर्वीचा फोटो तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही आधार कार्डमध्ये फोटो बदलवू शकता.

Aadhaar Card Photo : आधार कार्डवरील फोटो नाही आवडला, झटक्यात असा बदल
| Updated on: Apr 30, 2023 | 9:13 PM
Share

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card) हा एक महत्वपूर्ण दस्तावेज आहे. अनेकदा त्यातील त्रुटी दूर करावी लागते. आधार कार्डमध्ये पत्ता, नाव, फोटो यामध्ये बदल करणे आवश्यक असते. अशावेळी अपॉईंटमेंट (Appointment) घेऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट(Update) करु शकता. सरकारी योजनांपासून बँकिंग कामांसाठी आधार आवश्यक आहे. पण अचानक घर बदलते. वयाची अथवा इतर माहिती चुकीची येते. त्यामुळे त्यात दुरुस्ती करणे आवश्यक असते. तसेच तुमचा फोटो जुना झाला असेल, अथवा यापूर्वीचा फोटो तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही आधार कार्डमध्ये फोटो बदलवू शकता.

बदल करता येतो. आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर अगोदर तुम्हाला आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर अपॉईंटमेंट घेता येते. मोबाईल नंबर, आपला ईमेल आयडी, बायोमेट्रिक किंवा फोटो इत्यादी माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. पण इतर माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉईंटमेंट घेता येते. नवीन आधार कार्ड, पत्ता, नाव, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, स्त्री-पुरुष अशी लिंगविषयीची माहिती, जन्मतारीख यांची माहिती आधार केंद्रावरुन अपडेट होते.

मोबाईल नसेल तर इतर कार्डांप्रमाणेच आधार कार्ड तयार करताना चूक होते. छापण्यात चूक होते. तर कधी स्पेलिंग चुकते. ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जाता येते. अधिकृतपणे ऑनलाईन द्वारे काही ठिकाणी हे काम करण्यात येते. त्याठिकाणी ही दुरुस्ती करता येते. ही दुरुस्ती ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते. परंतु, ज्यांच्याकडे कोणताही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नाही, त्यांना आधार कार्डमध्ये दुरुस्ती करता येते. कारण ओटीपी जनरेट (OTP Generate) होणार नसल्याने हे आधार दुरुस्तीचे काम तुम्हाला ऑफलाईन करावे लागेल.

असे करा फोटो अपडेट

  1. तुम्हाला ऑनलाईन फोटो बदलण्याची परवानगी मिळत नाही
  2. तुम्हाला आधार केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने छायाचित्र बदलविता येईल
  3. त्यासाठी आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल
  4. संकेतस्थळावरुन फॉर्म डाऊनलोड करावा लागेल
  5. या अर्जात योग्य तपशील जमा करावा लागेल, त्यानंतर आधार केंद्रावर जावे लागेल
  6. आधार केंद्रावर अर्ज जमा करावा लागेल. त्याअगोदर 50 रुपये शुल्क द्यावे लागेल
  7. आधारा केंद्रावर छायाचित्र बदलण्याची माहिती द्यावी लागेल
  8. तुमचा क्रमांक येईपर्यत तुम्हाला वाट पहावी लागेल
  9. तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स चेक करा
  10. फोटो बदलण्यासाठी या केंद्रावर फोटो काढा
  11. त्यानंतर तुमची फोटो बदलण्याच्या विनंतीवर प्रक्रिया होईल
  12. पुढील 2 ते 4 दिवसांत छायाचित्र अपडेट होईल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.