PAN Card : पॅन कार्डचा गैरवापर होण्यापासून कसे वाचाल; फॉलो करा ‘या’ काही सोप्या टीप्स

PAN Card : पॅन कार्डचा गैरवापर होण्यापासून कसे वाचाल; फॉलो करा 'या' काही सोप्या टीप्स
Image Credit source: TV9 Marathi

अनेकदा पॅन कार्डचा गैरवापर करून फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पॅनचा वापर करून परस्पर कर्ज देखील काढले जाऊ शकते. त्यामुळे पॅनचा गैरवापर होणार नाही यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.

अजय देशपांडे

|

May 12, 2022 | 1:50 PM

पॅन कार्डला (PAN Card) आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणताही आर्थिक व्यवहार (Financial Transaction) पॅन कार्डशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तुम्हाला बँकेत खाते ओपन करायचे असेल तर पॅन कार्डची आवश्यकता असते. आयकर भरायचा असेल तरी देखील पॅन कार्डची आवश्यकता असते. थोडक्यात काय तर जिथे -जिथे पैशांचा संबंध येतो त्या सर्व ठिकाणी तुम्हाला पॅन कार्डची गरज भासते. पॅन हे एक तुमच्याकडे असलेले महत्त्वाचे डॉक्युमेंट (Document) आहे. पॅन कार्डवर एक नंबर दिलेला असतो. यामध्ये इग्रजी अक्षरांचे अल्फाबेट तसेच काही अंकांचा देखील समावेश असतो. याच दहा अंकांमध्ये तुमच्याबद्दलची तसेच तुम्ही जे आर्थिक व्यवहार करतात त्याबाबतची सर्व माहिती असते. सध्या पॅनचा गैर वापर करून फसवणुकीच्या प्रकरणात वाढ होत आहे. पॅनचा वापर करून परस्पर बँकेमधून कर्ज घेतल्याची देखील अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तुमच्या पॅन कार्डच्या मदतीने तुमच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देखील मिळवली जाते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आणि पॅन कार्डचा गैर वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पॅन कार्डचा गौर वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

  1. पॅन कार्डचा वापर तिथेच करा जिथे त्याची आवश्यकता असेल, ओळख पत्र म्हणून पॅन कार्डचा वापर करणे टाळा
  2. एखाद्या असुरक्षीत आणि व्हेरिफाय नसलेल्या वेबपोर्टवर काही माहिती सर्च करत असताना चुकनही तुमचा पॅन क्रमांक टाकू नका
  3. तुम्ही जर एखाद्या कामासाठी पॅन कार्डच्या झेरॉक्सचा वापर करणार असाल तर अशा झेरॉक्सवर सही आणि त्या दिवशीची तारीख टाकायला विसरू नका
  4. तुमच्या पॅन कार्डचा गैर वापर करून तुमच्या नावावर एखादा व्यक्ती परस्पर कर्ज घेऊ शकतो, अशी घटना होऊ नये म्हणून नियमितपणे आपला क्रेडिट स्कोर चेक करा
  5. तुम्ही तुमच्या मोबाईमध्ये पॅनशी कोणतीही डिटेल्स सेव्ह केली असेल तर ती डिलिट करा, आपल्या मोबाईलमध्ये कधीही पॅनशी संबंधित डिटेल्स ठेवू नका
  6. तुम्ही तुमचा फॉर्म 26A नियमित चेक करा. फॉर्म 26A द्वारे तुमच्या पॅन कार्डशी संबंधित असलेल्या सर्व व्यवहारांची माहिती मिळते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें