रेपो रेट वाढीचा थेट तुमच्या खिश्यावर परिणाम; वैयक्तिक, वाहन आणि गृहकर्ज महागले, जाणून घ्या कोणत्या बँकेने व्याजदरात किती केली वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये गेल्या काही दिवसांचा विचार करता 90 बेसिस पॉईंटची वाढ केली. या वाढीच्या मार्गावर देशातील सर्वच बँका वाटचाल करत आहेत. जवळपासच सर्वच बँकांनी वैयक्तिक, वाहन आणि गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.

रेपो रेट वाढीचा थेट तुमच्या खिश्यावर परिणाम; वैयक्तिक, वाहन आणि गृहकर्ज महागले, जाणून घ्या कोणत्या बँकेने व्याजदरात किती केली वाढ
रेपो रेटने कर्ज महाग Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 5:43 PM

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने (Monetary Policy Committee) नुकत्याच झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटसची वाढ केली. रेपो रेटमधील (Repo Rate) या वृद्धीमुळे अनेक बँकांनी ही त्यांच्या वैयक्तिक कर्ज (Personal Loan), गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्जासहीत (Vechile Loan) इतर प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात वाढीचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओवरसीज बँक आणि देशातील प्रमुख कर्ज पुरवठादार एचडीएफसी बँकेसहित इतर बँका आणि वित्तीय संस्थांनी त्यांच्या ग्राहकांना देण्यात येणा-या कर्जाच्या व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. गेल्या दोन दिवसांत ही वृद्धी झाली आहे. बँकांना आपत्कालीन परिस्थितीत केंद्रिय बँक रेपो दरावर कर्ज पुरवठा करते. रेपो दरातील वाढीने बँकांना मिळणारा कर्जपुरवठा ही महागला आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना मिळणा-या वित्तीय सेवांवर झाला आहे. बँकांनी त्यांचे वैयक्तिक, वाहन आणि गृहकर्ज व्याजदरात वृद्धीचा नारा दिला आहे.

आरबीआयने गेल्या 8 जून रोजी त्यांच्या द्वैमासिक मुद्रा समिक्षेत रेपो दरात 0.50 टक्के वाढीचा निर्णय घेतला आणि याविषयीची घोषणा केली. यापूर्वी गेल्या 4 मे रोजी सुद्धा केंद्रिय बँकेने कोणत्याही पूर्व निर्धारीत योजनेशिवाय अचानक रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. अशाप्रकारे अगदी कमी वेळेत देशातील प्रमुख बँकेने रेपो दरात एकूण 0.90 टक्क्यांची वाढ केली आहे. आता रेपो दर 4.90 टक्क्यांवर पोहचला आहे. महागाई प्रभाव आणि दबाव कमी करण्यासाठी आरबीआयने रेपो दरात वृद्धीचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

ICICI बँकेचा ईबीएलआर 8.6 टक्क्यांवर

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील बँक ICICI ने रेपो दराशी संबंधित बाह्य मानक उधारी दर हा 8.10 टक्क्यांहून वाढवून 8.60 केला. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने ही रेपो दराशी संबंधित बाह्य मानक उधारी दर हा पहिल्यांदा 6.90 टक्क्यांवरुन 7.40 टक्के इतका झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने पण आरएलएलआर मध्ये वाढ करत तो 7.40 टक्के केला आहे.

HDFC बँकेने आरबीएलआर 50 बेसिस पॉईंट्स वाढवला

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी लिमिटेडने गृहकर्जासाठी त्यांचा किरकोळ उधारी दरात 0.50 टक्क्यांची वृद्धी केली आहे. देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकने ही मौद्रिक नितीच्या घोषणेच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या ईबीएलआर मध्ये संशोधन केले आहे.

इंडियन बँकेची आरएलएलआर मध्ये 7.75 टक्क्यांची वृद्धी

इंडियन बँकेने आरएलएलआर मध्ये वृद्धी करत तो 7.70 टक्के आणि बँक ऑफ इंडियाने त्यांचा वृद्धी दर 7.75 टक्के केला आहे. पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रने तत्काळ प्रभावाने आरएलएलआर मध्ये 7.20 टक्क्यांहून वाढ करत तो 7.70 टक्के केला.

कॅनेरा बँकेचा एमसीएलआर 7.4 टक्के

कॅनेरा बँकेने 7 जून पासूनच त्यांच्या एक वर्षांच्या एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. बँकेने एमसीएलआर 7.35 टक्क्यांहून 7.40 टक्के इतका केला. त्याचा ग्राहकांच्या कर्जावर परिणाम होईल. कारण हे कर्ज एक वर्षाच्या एमसीएलआर दराशी संबंधित आहे. एमसीएलआर प्रणाली 1 एप्रिल 2016 पासून लागू झालेली आहे. 1 ऑक्टोबर 2019 पासून सर्व बँकांना आरबीआयच्या रेपो दरानुसार अथवा ट्रेझरी बिला रुपाचे मानक गृहित धरुन व्याज दरावर उधार देण्याचा नियम लागू करण्यात आला. परिणामी बँकांद्वारे मौद्रिक निती स्वीकारण्याच्या गतीत मोठया प्रमाणात वाढ झाली.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.