पर्सनल लोन घ्यायचं आहे का? ‘या’ बँका देता कमी व्याजदराने कर्ज, जाणून घ्या
तुम्हीही तुमच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्व बँकांच्या पर्सनल लोनच्या व्याजदरांची माहिती असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही कमी व्याजदरात पर्सनल लोन घेऊ शकता. कमी व्याजदर आकारणाऱ्या बँकांविषयी जाणून घेऊया.

आयुष्यात आर्थिक परिस्थिती कधी बिकट होईल, हे सांगता येत नाही. अनेकदा मेडिकल इमर्जन्सी किंवा लग्नामुळे लोकांना अचानक पैशांची गरज भासते. अशावेळी आपल्या गरजा भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे हा उत्तम पर्याय आहे.
कार लोन, होम लोन, एज्युकेशन लोन अशा लोकांच्या गरजा भागवण्यासाठी बँकेकडून अनेक प्रकारची कर्ज दिले जातात. यातील एक कर्ज वैयक्तिक कर्ज किंवा पर्सनल लोन हे आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी बँकेकडून पर्सनल लोन घेऊ शकता.
तुम्हीही तुमच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्व बँकांच्या पर्सनल लोनच्या व्याजदरांची माहिती असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही कमी व्याजदरात पर्सनल लोन घेऊ शकता.
आज आम्ही तुम्हाला अशा टॉप बँकांबद्दल सांगणार आहोत जिथून तुम्ही कमी व्याजदरात पर्सनल लोन घेऊ शकता. चला जाणून घेऊया.
HDFC बँकेच्या पर्सनल लोनचे व्याजदर किती?
HDFC बँकेचे पर्सनल लोनचे व्याजदर 10.85 टक्क्यांपासून सुरू होतात. याशिवाय ICICI बँकेचेही व्याजदर समान आहेत. आपल्या क्रेडिट स्कोअरनुसार हा व्याजदर कमी-अधिक असू शकतो.
इंडियन बँकेच्या पर्सनल लोनचे व्याजदर किती?
इंडियन बँक आपल्या ग्राहकांना 10.85 ते 16.10 टक्के व्याजदराने पर्सनल लोन देते.
कॅनरा बँकेच्या पर्सनल लोनचे व्याजदर किती?
कॅनरा बँकेकडून 10.95 ते 16.40 टक्के व्याजदराने पर्सनल लोन घेऊ शकता.
HDFC बँकेच्या पर्सनल लोनचे व्याजदर किती?
आयडीएफसी बँकेत तुम्ही 10.99 ते 23.99 टक्के व्याजदराने पर्सनल लोन घेऊ शकता.
कर्जाची परतफेड न केल्यास मालमत्तेवर जप्ती?
भारतात तुम्ही पर्सनल लोन फेडू शकत नसाल तर बँक तुमच्याविरोधात दिवाणी न्यायालयात दिवाणी खटला दाखल करू शकते. यासोबतच तुमची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते. यासोबतच तुमचा पगारही जप्त केला जाऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी बँकेचे कर्ज फेडावे लागते. इतकंच नाही तर पर्सनल लोन फेडू न शकल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळणं खूप कठीण होऊन बसतं.
कर्ज बुडविणाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा
अशा परिस्थितीत कर्ज बुडविणाऱ्यावर तुरुंगवासासह भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अन्वये गुन्हा ही दाखल केला जाऊ शकतो. कर्जाची परतफेड न झाल्यास बँका अनेक कर्ज वसुली एजन्सींचा देखील आधार घेतात. तुमच्यासोबत छळही होऊ शकतो.