Petrol-Diesel Price Today: देशातील ‘या’ शहरात पेट्रोलने ओलांडला 110 रुपयांचा टप्पा, जाणून घ्या राज्यातील इंधनदर

Petrol and Diesel | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे.

Petrol-Diesel Price Today: देशातील 'या' शहरात पेट्रोलने ओलांडला 110 रुपयांचा टप्पा, जाणून घ्या राज्यातील इंधनदर
पेट्रोल-डिझेल दर

नवी दिल्ली: गेल्या आठ दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असले तरी मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये पेट्रोलच्या किंमतीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. भोपाळमध्ये पेट्रोलने 110 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सध्या भोपाळमध्ये प्रतिलीटर पेट्रोलसाठी (Petrol) 110.20 रुपये तर डिझेलसाठी 98.67 रुपये मोजावे लागत आहेत. भोपाळपाठोपाठ मुंबई आणि दिल्लीत पेट्रोल सर्वाधिक महाग आहे. या दोन शहरांमध्ये प्रतिलीटर पेट्रोलसाठी अनुक्रमे 107.83 आणि 107.84 रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात 17 जुलैला शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती. यानंतरच्या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45
पुणे: पेट्रोल- 107.56, डिझेल 95.71
नाशिक: पेट्रोल- 107.70, डिझेल 95.85
औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69
कोल्हापूर: पेट्रोल- 107.80, डिझेल 95.97

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

संबंधित बातम्या:

देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI