रिझर्व्ह बँकेने ‘या’ लोकांसाठी Personal Loan ची लिमिट वाढवली, जाणून घ्या सर्वकाही

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 24, 2021 | 6:28 AM

Personal Loan | वैयक्तिक कर्जासाठीच्या 25 लाखांच्या मर्यादेचा नियम 1996 साली आखण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये महागाई वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच यामुळे अनेक तज्ज्ञ मंडळीही बँकेच्या संचालक मंडळावर काम करण्यास नकार देणार नाहीत.

रिझर्व्ह बँकेने 'या' लोकांसाठी Personal Loan ची लिमिट वाढवली, जाणून घ्या सर्वकाही

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता कोणत्याही बँकेचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वत:च्या किंवा दुसऱ्या बँकेतून आणखी जास्त वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेता येईल. रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा 25 टक्क्यांनी वाढवली आहे. आतपर्यंत संबंधित व्यक्तींना केवळ 25 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेता येत होते. मात्र, आरबीआयच्या निर्णयामुळे त्यांना आता 5 कोटी रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

वैयक्तिक कर्जासाठीच्या 25 लाखांच्या मर्यादेचा नियम 1996 साली आखण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये महागाई वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच यामुळे अनेक तज्ज्ञ मंडळीही बँकेच्या संचालक मंडळावर काम करण्यास नकार देणार नाहीत.

मात्र, हे वैयक्तिक कर्ज देण्यासाठी संचालक मंडळ किंवा व्यवस्थापकीय समितीची परवानगी आवश्यक आहे. त्याशिवाय कोणतीही बँक संचालक, व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांना आगाऊ कर्ज देऊ शकणार नाही.

चंदा कोचर यांनी घेतला होता गैरफायदा

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या संचालक आणि अध्यक्षपदाचा गैरफायदा घेतला होता. त्यांनी संचालक मंडळाच्या मंजुरीने आपल्या कुटुंबीयांना कर्ज मिळवून दिले होते. त्यांच्या कार्यकाळात व्हीडिओकॉन समूहाला 3250 कोटींचे कर्ज देण्यात आले होते. त्या मोबदल्यात वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या NuPower Renewables कंपनीत 64 कोटींची गुंतवणूक केली होती.

संबंधित बातम्या:

Personal Loan घेताय, मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कर्ज घेण्यासाठी धमाकेदार ऑफर, सगळ्यात कमी व्याज दरावर मिळणार 50 लाखांपर्यंत लोन

घर, कार आणि पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एसबीआयकडून खुशखबर

(RBI issue new guidelies for persoal loan for banks board of directors)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI