रेल्वेनं उत्तर भारतात प्रवास करताय, काही गाड्यांच्या मार्ग आणि वेळेतील बदल नक्की जाणून घ्या

अमृतसर-माननवाला स्थानकांदरम्यान रस्त्याखालील पुलाच्या कामामुळे काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.

रेल्वेनं उत्तर भारतात प्रवास करताय, काही गाड्यांच्या मार्ग आणि वेळेतील बदल नक्की जाणून घ्या
प्रातिनिधीक छायाचित्र


नवी दिल्ली: भारतीय रेल्वेकडून अमृतसर-माननवाला स्थानकांदरम्यान रस्त्याखालील पुलाच्या कामामुळे काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर-माननवाला स्थानकांदरम्यान रस्त्याखालील पुलाच्या कामामुळे 18 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर रोजी सुमारे 6 तास रेल्वे वाहतूक ठप्प असेल.

मननवाला-अमृतसर दरम्यान अंशत: रद्द

ट्रेन क्रमांक (02903) मुंबई सेंट्रल – अमृतसर विशेष प्रवासी गाडीचा अंतिम थांबा 21.11.2021 आणि 24.11.2021 रोजी माननवाला हा असेल. माननवाला-अमृतसर दरम्यान ही ट्रेन अंशतः रद्द करण्यात येणार आहे.

मार्गात बदल

ट्रेन क्रमांक (09415), 21.11.2021 रोजी निघेल, अहमदाबाद-श्री माता वैष्णोदेवी कटरा विशेष मार्गाने जालंधर सिटी-मुकेरियन-पठाणकोट जंक्शन मार्गे जाईल . ही ट्रेन बियास, अमृतसर आणि बटाला स्टेशनवर थांबणार नाही.

17 नोव्हेंबरला मुंबईहून निघालेली मुंबई सेंट्रल-अमृतसर विशेष गाडी क्रमांक (02903) बियास-तरनतारन-अमृतसर मार्गे प्रवास करेल. 18 , 22 आणि 25 नोव्हेबंरला ट्रेन क्रमांक (09225) जोधपूर-जम्मूतवी स्पेशल बरास्ता जालंधर सिटी-मुकेरियन-पठाणकोट जंक्शनमधून जाईल. ही ट्रेन बियास, अमृतसर, वेरका, बटाला, धारिवाल आणि गुरुदासपूर स्टेशनवर थांबणार नाही.

या गाड्यांचे वेळापत्रक बदललं

गाडी क्रमांक (02716) अमृतसर-श्री हजूर साहिब नांदेड विशेष प्रवास गाडी 19, 23 आणि 26 रोजी नियोजित वेळेनुसार पहाटे 04.25 ऐवजी 05.25 वाजता निघेल.

नागदा स्थानकावरील थांबा बंद

मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने आणखी काही बदल केले आहेत. या अंतर्गत, रेल्वेने ट्रेन क्रमांक (12951-12952) नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला नागदा स्थानकावर 18 नोव्हेंबर पासून खालीलप्रमाणे सहा महिन्यांच्या प्रायोगिक कालावधीसाठी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेन क्रमांक (12951) मुंबई सेंट्रल – नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस नागदा स्थानकावर 01.8 वाजता पोहोचेल आणि 01.10 वाजता निघेल. त्याच वेळी, परतीच्या दिशेने, ट्रेन क्रमांक (12952) नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल राजधानी एक्स्प्रेस रात्री 11.57 वाजता पोहोचल्यानंतर रात्री 11.59 वाजता निघेल.

इतर बातम्या:

भारतात क्रिप्टोकरन्सीला मिळणार सोने आणि शेअर्ससारखा दर्जा, नियंत्रण SEBI च्या हाती

विमान वाहतूक क्षेत्रात धमाक्याची तयारी, राकेश झुनझुनवालांकडून 2 दिवसांत 1 लाख कोटींचा सौदा

Routes and timings of these trains changed Indian railways released the complete list

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI