Rule Change From 1st September : थेट खिशावर होईल परिणाम, या बदलांची येईल नांदी

Rule Change From 1st September : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही ना काही बदल होतो. काही सेवांमध्ये बदल असतो. काही वस्तूंच्या किंमतीत बदल होतो. एलपीजी व इतर इंधनाचे दर कमी जास्त होतात. या 1 सप्टेंबर रोजी पण बदल होतील. त्याचा तुमच्या खिशावर परिणाम दिसेल.

Rule Change From 1st September : थेट खिशावर होईल परिणाम, या बदलांची येईल नांदी
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 2:41 PM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : सप्टेंबर महिना उद्यापासून सुरु होत आहे. 1 सप्टेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडर(Gas Cylinder) पासून तर इतर अनेक क्षेत्रात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नियमात काही ना काही बदल होतो. काही सेवांचे शुल्क, दर वाढतात. काही वस्तूंच्या किंमतीत बदल होतो. 1 सप्टेंबरपासून नियम बदलतील (Rule Change) . त्याचा फटका तुमच्या खिशाला बसेल. एलपीजी गॅस सिलेंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक बदल होण्याचा अंदाज आहे. CNG-PNG च्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. इतर ही क्षेत्रात बदलाचे वार आहे, काय होऊ शकतो बदल, जाणून घेऊयात..

LPG सिलेंडरच्या किंमती

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील तेल आणि गॅस वितरण कंपन्या गॅसच्या किंमतीत बदल करतात. अपडेट केलेल्या किंमती महिनाभर लागू असतात. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपातीची घोषणा केली आणि तात्काळ प्रभावाने ती लागू पण झाली. बुधवारपासूनच हा फायदा ग्राहकांना मिळाला आहे. त्यामुळे उद्या त्यात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. सर्वसामान्यांच्या किचन बजेटमध्ये कपात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

CNG-PNG मध्ये बदल

तेल कंपन्या दर महिन्याला एअर फ्युएलच्या किंमतीत पहिल्या दिवशी सुधारणा करतात. तर सीएनजी आणि पीएनजीच्या भावात पण बदल करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सीएनजी-पीएनजी ग्राहक पण त्रस्त आहेत.

IPO T+3 नियम

शेअर बाजारात सातत्याने नवीन तंत्राचा वापर करण्यात येत आहे. आता सेटलमेंटबाबत तर इतर देशांपेक्षा भारताने मोठे पाऊल टाकले आहे. शेअरची विक्री झाल्यानंतर लागलीच त्याच दिवशी संध्याकाळी शेअरधारकांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. आता आयपीओबाबत पण नियम बदलले आहे. आयपीओ बाजारात आल्यानंतर कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी पूर्वी 6 दिवसांचा कालावधी लागत होता. आता हा कालावधी अवघ्या 3 दिवसांवर आणण्यात आला आहे. SEBI ने याविषयीचे नोटिफिकेशन काढले आहे. 1 डिसेंबर 2023 पासून हा नियम सक्तीने पालन करावा लागेल .

क्रेडिट कार्ड

काही बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्डच्या नियम व अटींमध्ये बदल केला आहे. संबंधित बँकांच्या संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती घेता येईल. काही क्रेडिट कार्डवरील ऑफर बंद करण्यात आल्या आहेत. अथवा त्या विशिष्ट खरेदीवरच देण्यात येणार आहे. तुमच्याकडे कोणते क्रेडिट कार्ड आहे, त्या बँकेच्या संकेतस्थळावर त्याची माहिती मिळेल.

टेक होम सॅलरी वाढली

सप्टेंबर महिन्यापासून देशातील नोकरदारांना मोठा फायदा होईल. आयकर विभागाने त्यांना ऑगस्ट महिन्यातच गुडन्यूज दिली आहे. त्यानुसार, रेंट फ्री-अकोमोडेशनशी संबंधित नियमांमध्ये 1 सप्टेंबर 2023 पासून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी वाढली आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.